Reduce Uric Acid Naturally: युरिक ॲसिड वाढणे ही आजच्या काळातील अत्यंत सामान्य, पण अत्यंत वेदनादायी अवस्था आहे. हा त्रास वाढला की व्यक्तीचे उठणे-बसणे, चालणे-फिरणेदेखील अशक्यप्राय बनते. शरीरात तयार होणारे हे अवशिष्ट द्रव्य मूत्रपिंडांद्वारे बाहेर फेकले जायला हवे. मात्र, ते होत नसले तर सांध्यांत सूज, जळजळ आणि असह्य वेदना सुरू होतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, चुकीची आहारपद्धती, अत्याधिक मद्यपान, जास्त प्रमाणात शीतपेये, फ्रुक्टोजयुक्त पदार्थांचे सेवन, आनुवंशिक कारणे, वाढलेला रक्तदाब आणि काही औषधांचे दुष्परिणाम ही सर्व कारणे युरिक ॲसिड वाढवू शकतात.
युरिक ॲसिडची पातळी ७ mg/dl पेक्षा जास्त झाली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यासोबतच काही घरगुती उपायदेखील युरिक ॲसिड नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. अशाच एका उपायाबाबत आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर भूषण यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे.
हे खास पेय प्या… आणि युरिक ॲसिडला दाखवा सांध्यांबाहेरचा रस्ता!
डॉक्टर भूषण यांच्या मते, दुधी भोपळ्याचा ताजा रस हा युरिक ॲसिड कमी करण्यासाठी अचूक, रामबाण आहे. मात्र, पेय बनवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे.
पेय बनविण्याची पद्धत
- प्रथम दुधीची साल काढून त्यावर लिंबू चोळा, जेणेकरून त्यावरील कीटकनाशकांचे अवशेष निघून जातील.
- दुधी कडू नसल्याची खात्री करा.
- त्यानंतर एक काकडी स्वच्छ धुऊन घ्या.
- एक सफरचंद नीट स्वच्छ करून घ्या.
- हे तीनही पदार्थ मिक्सरमध्ये वाटून, त्याचा ताजा रस काढा.
आता या रसात :
- एक चमचा अॅलोव्हेरा रस
- एक चमचा गूळवेलीचा रस
- ३-४ तुळशीची पाने बारीक वाटून मिसळा
सर्व मिश्रण एकजीव करून हे पेय सकाळी रिकाम्या पोटी प्या.
या पेयानंतर एक ते दीड तास काहीही खाऊ-पिऊ नका.
किती दिवस हे पेय प्यावे?
हे पेय तीन ते चार आठवडे नियमित प्यायल्यास युरिक ॲसिड नियंत्रणात येते.
मग पहिल्या सात दिवसांतच-
- शरीरात हलकेपणा
- पचन सुधारणा
- बद्धकोष्ठता कमी होणे
- थकवा दूर होणे
- पायाच्या अंगठ्यातील वेदना कमी होणे
- सांधेदुखी घटणे
हे सर्व बदल स्पष्ट जाणवू लागतात.
काय खाऊ नये?
युरिक ॲसिडच्या नियंत्रणासाठी वर्ज्य करणे आवश्यक असलेले पदार्थ खालीलप्रमाणे :
- थंड पाण्याचे सेवन
- मांसाहार
- अंडी
- सर्व प्रकारच्या कडधान्यांचा त्याग
- मध
- मद्यपान (अल्कोहोल युरिक ॲसिड झपाट्याने वाढवते.)
या काळात फक्त कोमट पाणी प्या, त्यामुळे युरिक ॲसिडचे खडे तुटून बाहेर फेकले जातात.
काय खावे?
युरिक ॲसिड कमी करायचे असल्यास पोटॅशियमयुक्त आहार घ्या.
- टोमॅटो
- बुरशी (मशरूम)
- पोटॅशियमने समृद्ध पालेभाज्या
हे पदार्थ शरीरातील युरिक ॲसिड बाहेर काढण्यास मदत करतात.
