Burning Feet Remedies: रात्रीच्या वेळी अनेकांना पाय दुखणे किंवा पायांच्या तळव्यांची जळजळ जाणवते. काही जण याला फक्त थकवा किंवा उष्ण हवामानाचा परिणाम आहे म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, आयुर्वेदानुसार, हे शरीरात पित्त वाढल्याचे लक्षण आहे. ज्यावेळी शरीरात पित्त वाढते तेव्हा खालच्या अवयवांमध्ये म्हणजेच पायांमध्ये जळजळ होते. आधुनिक दृष्टिकोनातून मधुमेहामुळे नसा कमकुवत होणे, व्हिटॅमिन बी १२ किंवा लोहाची कमतरता, जास्त वेळ उभं राहणं, चुकीच्या चपला वापरणं किंवा मानसिक ताण यासारख्या कारणांमुळे देखील पायांमध्ये जळजळ होऊ शकते.

तळव्यांची जळजळ होण्याची लक्षणे

तळव्यांमध्ये जळजळ होणे, रात्रीच्या वेळी वाढलेली उष्णता आणि पाय जड होणे किंवा सुन्न होणे अशी या समस्येची लक्षणे आहेत. आयुर्वेदात याला पित्त किंवा वात दोष हे कारणीभूत घटक आहेत. म्हणूनच वात आणि पित्त यांचे संतुलन साधणे हे उपचारांसाठी सर्वात प्रभावी मानले जाते.

घरगुती उपाय

  • रात्री १० मिनिटे थंड पाण्यात किंवा गुलाब पाणी टाकलेल्या पाण्यात पाय ठेवा. त्यानंतर पाय कोरडे करून कोरफडीचे जेल, तूप किंवा नारळाच्या तेलाने हलक्या हाताने मसाज करा.
  • कडुनिंबाच्या पाण्याने पाय धुणे
  • पुदिना किंवा तुळशीचा पाला टाकलेला सरबत पिणे
  • आठवड्यातून दोनदा त्रिफळा पाण्यात पाय ठेवणे

कापूर

यावर काही आयुर्वेदिक उपायदेखील आहेत. कोरफडीच्या जेलमध्ये थोडा कापूर मिसळून रात्री तळव्यावर लावा. यामुळे थंडावा आणि आराम मिळतो. अंतर्गत उष्णता कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी शतावरी पावडर किंवा गिलॉयचा रस घेता येईल. नारळ पाणी आणि सफरचंद, टरबूज, भोपळा यासारखी थंड गुणधर्म असलेली फळं पित्त शांत करतात.

योग करा

जीवनशैलीत बदल करणे शक्य नसले तरी काही प्रमाणात थोडा वेळी योग करणं आवश्यक आहे. रबर किंवा सिंथेटिक शूजऐवजी कापडी किंवा आरामदायी चपला वापरा. योगाभ्यासात शीतली प्राणायम करा आणि मन शांत करण्यासाठी ध्यान करा. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२, लोह आणि कॅल्शियमचे संतुलन राखा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, काही चूर्ण किंवा इतर औषधे घेता येऊ शकतात.