Piles home remedies: मूळव्याध हा असा आजार आहे, जो कोणत्याही व्यक्तीला कधीही होऊ शकतो. या आजाराला वैद्यकीय भाषेत हॅमोराहोइड या नावाने ओळखले जाते. या आजारात प्रामुख्याने गुदाशय आणि गुद्द्वार येथील ठरावीक भागावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. मूळव्याध या आजाराबद्दल बोलायचे झाल्यास हा आजार प्रामुख्याने बद्धकोष्ठतेची समस्या उदभवल्याने होत असतो. बहुतेक वेळा बद्धकोष्ठता झाल्यावर पोट वेळेवर साफ होत नाही आणि अशा वेळी अनेकदा आपल्याला जास्त अतिरिक्त प्रमाणात दाब द्यावा लागतो. अशा वेळी गुदद्वाराच्या ज्या नसा असतात, त्यांच्यावर अतिरिक्त प्रमाणात ताण निर्माण होतो आणि परिणामी भविष्यात मूळव्याध होण्याची लक्षणे दिसून येतात.

रक्तरंजित (Internal) मूळव्याधीमध्ये सहसा चमकदार लाल रक्त येते, जे शौचाच्या वेळी किंवा टॉयलेट पेपरवर दिसू शकते, तर ‘सपाट’ किंवा Thrombosed मूळव्याधीमध्ये (जेथे रक्त गोठते) ते रक्त काळसर किंवा गडद लाल रंगाचे असू शकते आणि तीव्र वेदना, सूज व अस्वस्थता देऊ शकते, परंतु गडद रक्त इतर गंभीर आजारांचे लक्षण असू शकते, म्हणून डॉक्टरांना दाखवणे महत्त्वाचे आहे.

मूळव्याधीचे दोन प्रकार असतात : एकाला ‘सपाट मूळव्याध’ म्हणतात आणि दुसऱ्याला ‘रक्तरंजित मूळव्याध’ म्हणतात. रक्तरंजित मूळव्याधीमध्ये रक्तस्रावाचा रंग लाल असतो; तर सपाट मूळव्याधीमध्ये रक्ताचा रंग काळसर असतो. मलविसर्जन करताना गुदद्वारात वेदना व जळजळ होणे, गुदद्वाराजवळ खाज सुटणे, गुदद्वाराजवळ एक गाठ जाणवणे, आतड्याची पूर्णपणे स्वच्छता न होणे, मलामध्ये रक्त असणे, अशी लक्षणे मूळव्याधीमध्ये दिसून येतात. मूळव्याधामुळे मलमूत्र देखील वाहते.

आयुर्वेद तज्ज्ञ व योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, मूळव्याधीवर अत्यंत प्रभावी असे आयुर्वेदिक उपाय उपलब्ध आहेत. आयुर्वेदानुसार, जर काही पदार्थांचे दररोज सेवन केले, तर मूळव्याधीची लक्षणे औषधांशिवाय दूर होऊ शकतात.

दुधासोबत लिंबू घ्या

मूळव्याधीवरील उपचारासाठी दररोज लिंबू मिसळलेले थंड दूध प्या. दररोज थंड दूध आणि लिंबू यांचे मिश्रण प्यायल्याने मूळव्याध औषधांशिवाय तीन ते सात दिवसांत बरी होण्यास मदत होते.

अंजीराचे पाणी प्या

अंजीर हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले कोरडे फळ आहे. अंजीर खाल्ल्याने पोट स्वच्छ होते आणि बद्धकोष्ठता दूर होते. अंजीर पाण्यात भिजवून, ते पाणी प्यायल्याने मूळव्याधीमुळे होणाऱ्या गुदद्वाराच्या वेदना आणि सूज यांपासून आराम मिळतो.

लिंबू, आले आणि मध वापरून मूळव्याधांवर उपचार करा

मूळव्याधीवरील उपचारासाठी लिंबाचा रस व आल्याचा रस यामध्ये एक चमचा मध मिसळा आणि त्याचे सेवन करा. हे तिन्ही पदार्थ दाहकविरोधासह औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत आणि त्यात गुणधर्म आहेत, जे वेदना आणि सूज दूर करतात.

केळी आणि कापूरने मूळव्याधीवर उपचार करा

आयुर्वेदानुसार जर हरभरा व कापराचे केळ्यामध्ये मिसळून सेवन केले, तर मूळव्याध औषधाशिवाय बरी होऊ शकते.

कोरफडीचा रस घ्या

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने मूळव्याध बरे होण्यास मदत होते. कोरफडीच्या रसात दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे मूळव्याध बरे करण्यास मदत करतात. त्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि गुदद्वारातील जळजळ कमी होते.