सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात चांगली झोप मिळणे हे सर्वात मोठं सुख. परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे आपण या बाबीकडे दुर्लक्ष करतो. चांगली झोप घेणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तज्ञांनुसार दिवसातल्या २४ तासांपैकी ८ तास झोप घेणे उत्तम असते. मात्र झोप न येणे ही समस्या आजकाल प्रत्येकालाच भेडसावते. हल्ली सर्वांचीच झोपेच्या संबंधी तक्रार असते की झोपायला गेल्यावर लगेच झोप येत नाही. अशा परिस्थितीत आपण या ५ सोप्या टिप्सचा वापर करून चांगली झोप घेऊ शकतो.

चांगली झोप लागण्यासाठी फॉलो करा या ५ सोप्या टिप्स :

झोपण्याच्या अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा

असे केल्याने आपल्या शरीराला झोपण्याआधी आराम करण्याचा वेळ मिळेल. ही सवय सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची आहे. झोपण्याआधी टीव्हीही पाहू नये तसेच कंप्यूटरवर कामही करू नये. त्याचबरोबर, झोपण्याआधी मोबाईलचा जास्त वापर करू नये.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

सतत चष्मा वापरून तुमच्याही डोळ्याजवळ व्रण आले आहेत का? या सोप्या टिप्स वापरून घालवा डाग

झोपण्याआधी गरम पाण्याने अंघोळ करावी

तज्ञांनुसार झोपण्याच्या आधी गरम पाण्याने अंघोळ केल्याने हात-पायांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. अंघोळ केल्यावर लगेचच झोपायला जावे. परंतु जर तुम्ही आंघोळ करून पुन्हा हॉलमध्ये परत आलात आणि टीव्ही पाहण्यास सुरुवात केली तर तुम्ही स्वतःला पुन्हा सक्रिय कराल.

बेडरूममध्ये अंधार आणि शांतता असावी

जास्त प्रकाश तुमच्या शरीरातील मेलाटोनिन (झोपेचा हार्मोन) उत्पादनात व्यत्यय आणेल. तुमच्या बेडरूमच्या खिडक्या आणि पडदे बंद असतील याची खात्री करून घ्या. तरीही तुमच्या खोलीत प्रकाश येत असेल तर आय मास्कचा वापर करावा.

Heat Wave चा सामना करण्यासाठी उन्हाळ्यात दररोज प्या नारळपाणी; शरीराला होतील ‘हे’ फायदे

बेडवर फोन, कॉम्प्युटर किंवा टीव्हीचा वापर टाळा

बहुतेकजण आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट फोन बघून करतात. म्हणजेच ते झोपण्याच्या आधी आणि झोपून उठल्यावर लगेचच फोनचा वापर करतात. अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे की झोपण्याआधी स्क्रीन पाहिल्याने झोप येण्याच्या वेळेत वाढ होऊ शकते. तसेच, यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी आपले लक्ष विचलित करू शकते.

कॅफिनच्या सेवनावर लक्ष ठेवा

झोपण्याच्या सहा तास आधी कॅफिनचे सेवन केल्याने झोप एक तास कमी होते. वृद्ध आणि प्रौढांमध्ये या समस्या अधिक प्रमाणात जाणवतात. कारण त्यांच्या शरीराला कॅफिनवर प्रक्रिया करण्यासाठी जास्त वेळ लागतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)