Raw vs ripe banana : मधुमेह हा असा आजार आहे की, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जर मधुमेही रुग्णांनी आहारात कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी केले आणि प्रथिने आणि निरोगी चरबीचा समावेश केला, तर ते त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सहजपणे नियंत्रित करू शकतात. मधुमेही रुग्णांसाठी फळांचे सेवन खूप फायदेशीर आहे. फळांचे सेवन केल्याने गोड पदार्थांची इच्छा नियंत्रित होते आणि शरीराला पुरेसे पोषणदेखील मिळते. मधुमेही रुग्ण काही फळे खूप विचारपूर्वक खातात. केळी हे असे एक फळ आहे की, जे खाण्यास मधुमेही रुग्ण घाबरतात. दरम्यान, असा प्रश्न उदभवतो की, जर मधुमेही रुग्ण केळी खाऊ शकतात, तर त्यांनी कच्चे केळे खावे की पिकलेले केळे. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी कोणत्या प्रकारचे केळे खावे.

मधुमेह तज्ज्ञ व फिटनेस प्रशिक्षक डॉ. अनुपम घोष स्पष्ट करतात की, मधुमेहीदेखील केळी खाऊ शकतात. जे मधुमेही केळी खाऊन रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवू इच्छितात, त्यांनी पिकलेले नाही, तर कच्चे केळे निवडावे. कच्चे केळे मधुमेह नियंत्रित करण्यास कसे मदत करते हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.

केळी आणि मधुमेहाचा संबंध

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, मधुमेही व्यक्ती संतुलित प्रमाणात केळी खाऊ शकते. त्याच वेळी अमेरिकन डायबेटीज असोसिएशन (ADA)देखील फळांना आहाराचा एक भाग मानते, ज्यामध्ये केळ्याचादेखील समावेश आहे. ADA नुसार, जर मधुमेही रुग्ण मर्यादित प्रमाणात केळ्याचे सेवन करीत असतील, तर ते केळी खाऊन त्यांची साखर सामान्य करू शकतात. साधारणपणे १०० ग्रॅम केळ्यामध्ये सुमारे २३ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. केळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि ग्लायसेमिक लोड (GL) दोन्ही मध्यम किंवा कमी मानले जातात. त्याचा अर्थ असा की, केळे रक्तातील साखरेचे प्रमाण फार वेगाने वाढवत नाही.

मधुमेहाच्या रुग्णांना केळ्याचा कसा फायदा होतो?

केळ्यामध्ये विरघळणारे फायबर असते, जे पोटात जेलसारखे पदार्थ बनवते, ज्यामुळे साखरेचे शोषण कमी होते. केळ्यामधील प्रतिरोधक स्टार्च हळूहळू पचतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. केळ्यामधील जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला असंख्य फायदे देतात. कच्च्या केळ्याच्या सेवनाने आतडेही स्वच्छ होण्यास मदत होते.

मधुमेहींनी कच्चे केळे इष्ट

मधुमेही रुग्णांसाठी केळी पूर्णपणे निषिद्ध नाही. परंतु, प्रश्न असा उद्भवतो की कच्चे केळे खावे की पिकलेले केळे? तज्ज्ञांच्या मते, मधुमेही रुग्णांनी कच्चे केळे खावे. कच्चे केळे पिकलेल्या केळ्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकते. कच्च्या केळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते. कच्च्या केळ्य मध्ये जास्त प्रतिरोधक स्टार्च असतो, जो हळूहळू पचतो आणि रक्तातील साखर सामान्य ठेवतो. या केळ्यामध्ये असलेले फायबर पचन कमी करते आणि इन्सुलिनचा प्रतिसाद सुधारते. आम्ही तुम्हाला सांगतो की, पिकलेल्या केळ्यामध्ये जास्त साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.