Healthiest Way To Eat Bananas: केळी हे जवळजवळ सर्वांनाच आवडते फळ आहे. शिवाय ते सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असते. कोणतीही खटाटोप न करता आणि खाण्यासाठी असे अत्यंत पौष्टिक. पण तुम्हाला माहिती आहे का की केळीचे फायदे ते किती पिकले आहे यावर देखील अवलंबून असतात. हिरव्या ते पिवळ्या आणि तपकिरी ठिपके असलेली केळी अशा प्रत्येक टप्प्याचे तुमच्या शरीरावर वेगवेगळे परिणाम असतात असं तज्ज्ञांचं मत आहे. हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड इथल्या प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट यांनी याबाबत माहिती दिली आहे. केळ्याचा कोणता टप्पा आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर असतो हे सांगितले आहे.

पहिली पायरी- हिरवी केळी

कच्च्या आणि हिरव्या केळ्यांमध्ये प्रतिरोधक स्टार्च असतो. हा स्टार्च तुमच्या आतड्यांसाठी अत्यंत फायदेशीर असतो. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, त्यात फायबरचे प्रमाण जास्त आणि साखरेचे प्रमाण कमी असते. १०० ग्रॅम हिरव्या केळ्यांमध्ये सुमारे १० ग्रॅम साखर असते. ते आतड्याच्या आरोग्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणासाठी उत्कृष्ट आहेत. असं असलं तरी त्यांची चव थोडी कडू असते आणि काही लोकांसाठी ते पचण्यास जड असू शकते.

दुसरी पायरी- हलक्या हिरव्या रंगाची केळी

तज्ज्ञ सांगतात की, केळी खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेव्हा ती थोडीशी हिरवी असतात. म्हणजेच ती पूर्णपणे कच्ची किंवा पूर्णपणे पिकलेली नसतात. या टप्प्यावर केळ्यांमध्ये सुमारे २.५ ग्रॅम फायबर असते आणि त्यात पोटॅशियम देखील जास्त असते. ते पोटासाठी चांगले असतात, ऊर्जा देतात आणि रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत करतात. यामुळे ते दररोज खाण्यासाठी सर्वात आरोग्यदायी ठरतात.

तिसरी पायरी- पूर्ण पिवळी केळी

जेव्हा केळी पूर्णपणे पिवळी होतात, तेव्हा त्यातला स्टार्च साखरेत रूपांतरित होतो. त्यामुळे ते सहज पचण्याजोगे आणि ऊर्जा देणारे ठरते. तज्ज्ञ सांगतात की, केळ्यामध्ये कमी प्रतिरोधक स्टार्च असते, मात्र व्हिटॅमिन सी, बी ५ आणि अँटी-ऑक्सिडंट्स जास्त असतात. म्हणूनच व्यायामापूर्वी किंवा थकवा आल्यानंतर त्वरित ऊर्जेसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

चौथी पायरी- तपकिरी ठिपके असलेले केळ

जर तुम्हाला केळ्यावर तपकिरी ठिपके दिसले तर ती फेकून देऊ नका. या टप्प्यावर केळ्यामध्ये सुमारे १७ ग्रॅम साखर असते. त्यात थोडे कमी फायबर असते, मात्र अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण सर्वाधिक असते. ही अवस्था चवीसाठी आणि अँटीऑक्सिडंट्स वाढवण्यासाठी चांगली असते. पण रक्तातील साखर वाढवण्यासाठी नाही.

कोणते केळ सर्वात चांगले?

प्रत्येक प्रकारचे केळ त्याच्या पद्धतीने फायदेशीर आहे. मात्र जर तुम्हाला फायबर, पोषक तत्वे आणि नैसर्गिक गोडवा यांचे संतुलन हवे असेल तर थोडे हिरवे केळ सर्वात उत्तम आहे. ते तुमचे आतडे निरोगी ठेवते, रक्तातील साखर नियंत्रित करते आणि दिवसभर ऊर्जा देते.