तुमचे बँकेत महत्त्वाचे काम असेल, जे घरबसल्या ऑनलाइन करता येत नसेल, तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा. कारण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये बँकांना अधिक सुट्या असणार आहेत. यामुळे तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम किंवा महत्त्वाचा व्यवहार असेल तर आठवड्यापूर्वीच निपटून काढा. या सुट्या वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडणार आहेत. मात्र, या कालावधीत ऑनलाइन सेवा सुरू राहतील. माहितीनुसार, डिसेंबर २०२१ च्या उरलेल्या दिवसांपैकी ८ दिवस आणि जानेवारीत १२ दिवस असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँकांच्या संपामुळे ही बँक बंद राहणार आहे

बँकांच्या प्रस्तावित खाजगीकरणाच्या निषेधार्थ बँक संघटनांनी येत्या आठवड्यात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या बँकिंग संपामुळे १६ डिसेंबर (गुरुवार) आणि १७ डिसेंबर (शुक्रवार) असे दोन दिवस बँक शाखा बंद राहणार आहेत. याशिवाय मेघालय आणि छत्तीसगडमध्ये १८ डिसेंबर रोजी यू सोसो थाम पुण्यतिथी आणि गुरु घासीदास जयंतीनिमित्त बँका बंद राहतील. त्याचवेळी १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यात बँक बंद राहणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank holiday from next week 8 days in december 2021 and 12 days in january 2022 banks will remain closed scsm
First published on: 09-12-2021 at 19:09 IST