scorecardresearch

ऑगस्टमध्ये बँकांना ९ दिवस सुट्टी; २२ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. यानुसार महाराष्ट्रातील बँकांना ९ दिवस सुट्टी आहे तर २२ दिवस बँकांचे व्यवहार सुरु असणार आहेत.

Bank Holiday in August 2021
ऑगस्ट २०२१ मध्ये बँकांना ९ दिवस सुट्टी

बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात ९ दिवस सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. कोरोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी

मुंबई आणि नागपूर विभागातील बँकांना १६ आणि १९ ऑगस्ट रोजी सुट्टी असणार आहे. १६ ऑगस्टला पारसी नववर्षानिमित्त तर १९ ऑगस्ट रोजी मोहर्रमनिमित्त महाराष्ट्रातील बँका बंद राहतील. तसेच पाच रविवार आणि दोन शनिवार (दुसरा आणि चौथा) असे सात दिवस म्हणजेच एकूण ९ दिवस राज्यातील बँका बंद राहणार असल्याने ३१ दिवसांपैकी केवळ २२ दिवसच राज्यांमधील बँकांमध्ये व्यवहार होणार आहेत. १६ तारखेची सुट्टी ही सोमवारी असल्याने १४,१५,१६ अशी सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने महिन्याच्या मध्यवर्ती दिवसांमध्ये बँकेची काम न ठेवल्यास आर्थिक व्यवहार खोळंबणार नाहीत. तशापद्धतीने आताच नियोजन करणे फायद्याचे ठरेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-07-2021 at 11:22 IST
ताज्या बातम्या