New Bank Opening Time: बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता तुम्हाला बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी १ तासाचा अतिरिक्त वेळ मिळेल. आरबीआय (RBI) ने १८ एप्रिल २०२२ पासून बाजाराच्या ट्रेडिंगच्या वेळेपासून बँकेच्या वेळेत बदल केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ४ दिवस बँक बंद राहिल्यानंतर सोमवार, १८ एप्रिल २०२२ पासून बँका उघडण्याच्या वेळा बदलल्या आहेत. सोमवारपासून बँका सकाळी ९ वाजता सुरू होतील.

RBI ने लागू केली नवीन प्रणाली

बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यानुसार बँकांच्या कामकाजात आणखी एक तासाची भर पडली आहे. विशेष म्हणजे, करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दिवसभरात बँका उघडण्याचे तास कमी करण्यात आले होते. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशा परिस्थितीत, आरबीआयने १८ एप्रिल २०२२ पासून ही सुविधा लागू करत आहे.

nestle controversy
Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
lok sabha election 2024
लेख : आजच्या मतदानाची टक्केवारी सांगणार देशाचा मूड..
An ambulance was successfully given way through a crowd of 5 lakh during the rang panchami
VIDEO: माणुसकी! पाच लाखांच्या गर्दीतही मिळाली रुग्णवाहिकेला वाट; अभूतपूर्व क्षण
Lakshmi Narayan Rajyog and Budhaditya Rajyog
१०० वर्षांनी एकाचवेळी २ शुभ राजयोग घडणार; ९ एप्रिलपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? होऊ शकतात श्रीमंत

बाजारातील ट्रेडिंगचीही वेळही बदलली

परकीय चलन बाजार आणि सरकारी रोख्यांमधील व्यवहार आता बदललेल्या वेळेनुसार शक्य होणार असल्याचेही आरबीआयने आपल्या प्रकाशनात म्हटले आहे. १८ एप्रिल २०२२ पासून, रिझर्व्ह बँकेच्या नियमन केलेल्या बाजारात जसे की फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह, रुपयाचे व्याजदर डेरिव्हेटिव्ह, कॉर्पोरेट बाँडमधील रेपो इत्यादी फॉरेन एक्स्चेंज (FCY)/भारतीय रुपया (INR) ट्रेड्समधील व्यवहार त्याच्या प्री-कोविड वेळेच्या तुलनेत सकाळी १० वाजता ऐवजी ९ वाजता पासून सुरू होईल.

जुनी प्रणाली पुन्हा लागू

विशेष म्हणजे, २०२० मधील करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, आरबीआयने ७ एप्रिल रोजी बाजाराच्या व्यापाराचे तास बदलले होते. बाजाराच्या वेळा सकाळी १० ते दुपारी ३.३० पर्यंत बदलण्यात आल्या होत्या, व्यापाराचे तास अर्ध्या तासाने कमी करण्यात आले. पण आता परिस्थिती सामान्य होत आहे, त्यानंतर आता आरबीआय जुने वेळापत्रक पुन्हा लागू करत आहे.