दररोज आंघोळ करणे ही माणसाची गरज आहे, यामुळे वैयक्तिक स्वच्छता तर चांगली राहतेच पण मनाला नवीन ताजेपणाही मिळतो. उन्हाळ्याच्या हंगामात, लोकांना एकापेक्षा जास्त वेळा आंघोळ करायला आवडते. कारण कडक सूर्यप्रकाश आणि आर्द्रतेमुळे खूप घाम येतो. आज आम्ही तुम्हाला रात्री अंघोळीचे फायदे सांगणार आहोत. दिवसभराच्या धावपळीनंतर शरीर आणि मन दोन्ही थकतात. अशा परिस्थितीत रात्री अंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. यावेळी आंघोळ केल्याने थकवा तर दूर होतोच. पण त्याचे अनेक फायदे होऊ शकतात.

रात्री अंघोळीचे ५ फायदे

Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
  1. शांत झोप येईल
    लोकांना रात्री अंघोळ करण्यात आळशी वाटते. रात्री अंघोळ केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे मूडही फ्रेश होतो, त्यामुळे रात्री झोपायला त्रास होत नाही आणि शांत झोप लागते.
  2. रक्तदाब नियंत्रण
    तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्रीच्या वेळी आंघोळ केल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रित राहू शकतो? पण हे खरे आहे. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी रात्री अंघोळ करावी. त्यामुळे त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.
  3. लठ्ठपणा कमी होईल
    जेव्हा आपण खूप थंड किंवा गरम पाण्याने आंघोळ करतो तेव्हा कॅलरीज बर्न होऊ लागतात, ज्यामुळे आपला लठ्ठपणा कमी होतो, परंतु लक्षात ठेवा की पाणी इतके गरम नसावे की ते आपल्या त्वचेला हानी पोहोचवेल. पाण्याचे तापमान तुमच्या शरीराला जेवढे सहन करता येईल तेवढे ठेवा, रात्री अंघोळ केल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात असे आढळून आले आहे.
  4. रक्ताभिसरण वाढतं
    रात्री कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे तुमच्या शरीराचा थकवा दूर होतो, तसेच झोपही चांगली येते. जर तुम्हाला रात्री झोपताना थकवा जाणवत असेल तर रात्री गरम पाण्याने अंघोळ करणे तुमच्यासाठी एक चांगला उपाय आहे.
  5. त्वचेच्या समस्या दूर होतील
    जर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या असतील तर रात्री अंघोळ करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. असे केल्याने पिंपल्स, कोरडी आणि निर्जीव त्वचेची समस्या दूर होते. तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार राहते. रात्री आंघोळ केल्यानंतर त्वचेवर चांगले मॉइश्चरायझर लावा आणि मग झोपी जा. याशिवाय प्रयत्न करा की जेव्हाही तुम्ही बाहेरून घरी परताल तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवा.

आणखी वाचा : Bloating: : खाल्ल्यानंतर तुमचं पोट फुगतं? मग या ४ गोष्टी तुमच्या आहारातून ताबडतोब काढून टाका

(टीप: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. )