How To Clean A Plastic Bucket :अगदी बाजारातून नवीन आणलेली ती चकाकणारी प्लास्टिकची बादली काही दिवासांमध्येच कठकटली? पण असे का होते? काही दिसवांनी अंघोळीची बादली किंवा मगवर पांढरट-पिवळट थर कसा साचतो? आपण कितीही घासली तरी तो कसला हट्टी डाग जातच नाही!
खारे पाणी म्हणजे आपल्या बादलीचा आणि मग यांचा सर्वाचा मोठा शत्रू आहे. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे मिनरल्स असतात, जे हळूहळू प्लास्टिकवर घट्ट पापुद्रा तयार करतात. मग काय, साध्या साबणाने किंवा डिशवॉशने घासून हात दुखतात, पण डाग मात्र जाता जात नाहीत.
पण काळजी करू नका! आता त्या खाऱ्या पाण्याचा डाग काढण्यासाठी तासनतास घासत बसण्याची मुळीच गरज नाही. आपल्या घरातल्याच काही साध्या घटक वापरून ही बादली अगदी नव्यासारखी चकाचक करता येईल. चला तर मग, जाणून घेऊया सोपे आणि भारी घरगुती उपाय!
१) व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा जादूई फॉर्म्युला (White Vinegar & Baking Soda Hack)
- जर डाग खूप जुने नसतील आणि नव्यानेच पांढरट थर साचू लागला असेल, तर हा उपाय एकदम बेस्ट आहे:
- एका वाटीत २ चमचे बेकिंग सोडा आणि अर्धा कप पांढरे व्हिनेगर (White Vinegar) एकत्र करून छान पेस्ट बनवा.
- ही पेस्ट बादलीवर किंवा मगावर जिथे डाग आहेत, तिथे नीट लावून घ्या.
- आता ते १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवून द्या.
- थोड्या वेळाने हलक्या हाताने स्क्रब वापरून घासा आणि स्वच्छ पाण्याने बादली धुवून टाका. एकदम नव्यासारखी चकाकेल!
२) लिंबू आणि मीठाची कमाल (Lemon & Salt Trick)
- लिंबू आणि मीठ हा आपल्या घरातला असा घटक आहे, जो कसलाही मळ चुटकीसरशी गायब करू शकतो:
- एक लिंबू अर्धा कापून घ्या आणि त्यावर भरपूर मीठ भुरभुरा.
- आता हे लिंबू बादलीवर जिथे पांढरे-पिवळे डाग पडलेत, तिथे जोरात आणि गोल-गोल फिरवून चोळा.
- हे लावून १० मिनिटे तसेच राहू द्या.
- १० मिनिटांनंतर थोडं घासून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, बादली एकदम चकाचक दिसेल.
३) सायट्रीक ॲसिडचा उपाय – जुन्या हट्टी डागांवर प्रभावी! (Citric Acid Solution for Stubborn Stains)
- जर डाग वर्षानुवर्षे जुने असतील आणि साध्या उपायांनी निघत नसतील, तर हा कडक उपाय करा:
- त्या मळकट दिसणाऱ्या आणि डाग पडलेल्या बादलीमध्ये कोमट पाणी भरा.
- या कोमट पाण्यात २ ते ३ चमचे सायट्रीक ॲसिडची पावडर (Citric Acid Powder) टाका आणि चमच्याने ढवळून विरघळवून घ्या.
- हे पाणी बादलीत तसेच ३० मिनिटांसाठी मुरत ठेवा.
- अर्ध्या तासानंतर ते पाणी फेकून द्या आणि डिशवॉश लिक्विड किंवा सोप्या स्क्रबरने हलक्या हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. कितीही जुना डाग असेल तरी गायब होईल!
बादलीला खारे पाण्याच्या डागांपासून कसं वाचवाल? (Tips to Prevent Hard Water Stains)
- सतत बादली खराब होऊ नये म्हणून या काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा:
- बादली वापरून झाल्यानंतर ती नेहमी उलटी करून ठेवा.
- बादलीत किंवा मग यामध्ये पाणी साचवून ठेवू नका.
- असं केल्यामुळे पाण्यातील मिनरल्स प्लास्टिकवर सुकणार नाहीत आणि बादली नेहमी नवीनसारखी राहील!
- मग आजच करून पाहा हे सोपे उपाय आणि तुमच्या बाथरूमची बादली एकदम चकाचक चमकवा!
