Tips and tricks: अनेकदा लोक घरातील फर्निचरची विशेष काळजी घेतात. त्यांना पाणी किंवा वातावरणातील आर्द्रतेपासून संरक्षित ठेवण्यासाठी, वेगवेगळ्या उपायांचा अवलंब केला जातो. पाणी किंवा आर्द्रतेमुळे फर्निचर लवकर खराब होता नये, यामुळे बहुतेक लोक फर्निचरला पाण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण यामध्ये लोक बाथरूमचा दरवाजा विसरतात. बाथरूमच्या दारावर नेहमी पाणी असते, त्यामुळे लाकूड लवकर खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही बाथरूमचा दरवाजा खराब होण्यापासून वाचवू शकता.

सहसा, घरांमधील पाण्याचे बहुतेक काम बाथरूममध्ये केले जाते, त्यामुळे बाथरूमच्या दारांवर वारंवार पाणी शिंपडते आणि बाथरूमचे दरवाजे खराब होऊ लागतात. अशा परिस्थितीत काही स्मार्ट टिप्सच्या मदतीने तुम्ही बाथरूमचा दरवाजा खराब होण्यापासून तर वाचवू शकताच त्याचप्रमाणे दारांची शेल्फ लाइफही वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया बाथरूमचा दरवाजा सुरक्षित ठेवण्याचे उपाय.

How to remove the smell of sweat from clothes
घामाचा वास घालवण्यासाठी वापरून पाहा या ४ भन्नाट ट्रिक, झटपट गायब होईल दुर्गंध
itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Bank Holiday in May 2024 in Marath
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

( हे ही वाचा: ऑनलाइन शॉपिंग करताना ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा; हे मुद्दे तुम्हाला Amazon-Flipkart वर तोट्यापासून वाचवतील)

कोल्क टेप सहित सील करा

बाथरुमच्या दारात पाणी आल्याने अनेकदा दरवाजा बाजूने खराब होऊ लागतो. अशा परिस्थितीत, पाण्यापासून दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी, दरवाजाच्या बाजूला कोलक टेप लावा. कोल्क टेप वॉटर प्रूफ असल्याने, कोलक टेप पाणी दरवाजापासून दूर ठेवण्यास उपयुक्त ठरेल आणि तुमच्या बाथरूमच्या दरवाजाला इजा होणार नाही.

अॅल्युमिनियम गेट्स स्थापित करा

लाकडी दारांवर वारंवार पाणी टाकल्याने लाकूड फुगायला लागते. अशा स्थितीत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाथरूममध्ये लाकडाच्या ऐवजी अॅल्युमिनियमचा दरवाजा घेऊ शकता. अॅल्युमिनिअमचे दरवाजे स्वस्त देखील आहेत तसेच पूर्णपणे वॉटरप्रूफ देखील आहेत.

( हे ही वाचा: अशाप्रकारे बनवा Instagram Reels; आपोआप होईल व्ह्यूज आणि फॉलोअर्सची झपाट्याने वाढ)

तुंग तेल वापरा

तुंग तेल लाकडासाठी पाणी प्रतिरोधक म्हणून कार्य करते. अशा स्थितीत बाथरूमच्या दारावर तुंगाचे तेल लावून तुम्ही दाराला पाण्यापासून वाचवू शकता. तसेच तुंग तेल लावल्याने दाराचे फिनिशिंगही येऊ लागते. दुसरीकडे, जर तुमच्याकडे तुंगाचे तेल नसेल तर तुम्ही सागवान किंवा जवसाचे तेल देखील वापरू शकता.