सौंदर्य खुलवण्यासाठी रोज वापरा गुलाबपाणी

जाणून घ्या गुलाबपाण्याचे फायदे

गुलाबपाणी त्वचेचा काळपटपणा घालवण्यास मदत करतं.

आपली त्वचा कोमल, उजळ व्हावी असं जवळपास सर्वच महिलांना वाटतं, त्यासाठी अनेकदा सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. पण सौंदर्य प्रसाधनांमध्ये असलेल्या रासायनिक घटकांमुळे त्वचेला हानी पोहोचते. तेव्हा या सौंदर्य प्रसाधनांपेक्षा त्वचेसाठी गुलाबपाण्याचा वापर केला तर अधिक फायदेशीर ठरू शकतो
– थंडीच्या दिवसात त्वचा अधिक रुक्ष होते, अशावेळी रात्री झोपताना गुलाबपाणी चेहऱ्यावर लावावे, त्वचा मऊ राहण्यास मदत होते.
– क्लिनझिंग म्हणूनही गुलाबपाण्याचा वापर करता येतो. त्यामुळे बाहेरून आल्यावर गुलाबपाण्याने चेहरा साफ केल्यास त्वचेवरील घाण, मळ निघून जाते.
– त्वचेचा दाह कमी करण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. अनेकदा उन्हातून आल्यानंतर त्वचेचा दाह होतो तेव्हा गुलाबपाणी त्या भागावर लावल्यास हा त्रास कमी होतो.

– कापसावर गुलाबपाणी टाकून हा कापूस डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो. दिवसातून दोन वेळा १५ मिनीटांसाठी हा उपाय केल्यास फायदेशीर ठरेल.
– गुलाबपाणी त्वचेचा काळपटपणा घालवण्यास मदत करतं.
– पिंपल्स जाण्यासाठी चंदन आणि हळद पावडर यामध्ये गुलाबपाणी एकत्र करून लावल्यास पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
– पायाला भेगा पडल्या असतील तर एरंडेल तेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर दिवसातून २ वेळा लावल्यास भेगा लवकर भरून निघतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Beauty benefits of rose water in marathi

ताज्या बातम्या