प्रत्येकाला सुंदर त्वचा हवी असते. महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जणू रात्री उशिरा झोपल्याने चेहऱ्यावर काळी वर्तुळे येतात, ते लपवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. ज्यामध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तर काहीवेळा या उत्पादनाचा दुष्परिणाम देखील लगेच त्वचेवर दिसून येतात. अशातच तुम्हाला आता कोणत्याही साइड इफेक्टशिवाय सुंदर त्वचा हवी असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा. या टिप्स फॉलो केल्यास तुमची त्वचा सुंदर करण्यास तुम्हाला पूर्ण मदत होईल. परंतु लक्षात ठेवा की ही एका दिवसातच होईल असं नाही म्हणून तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल.

हे लक्षात ठेवा

नेहमी लक्षात ठेवा की रात्री झोपण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे काढून टाका. रात्रीच्या वेळी त्वचेला पूर्णपणे श्वास घेणे खूप आवश्यक आहे. मेकअपमुळे चेहऱ्याचे छिद्र बंद होतात, त्यामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स दिसतात. मेकअप काढण्यासाठी कापसाच्या तुकड्यावर ऑलिव्ह ऑईल लावून चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर या तेलाने मसाज करा.

Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

ताज्या भाज्या खा

नैसर्गिकरित्या सुंदर त्वचेसाठी कोणत्या प्रकारचे अन्न तुम्ही खात आहात याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, भरपूर प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेल्या भाज्यांचा समावेश करा. व्हिटॅमिन सी समृद्ध आणि फॅट, कमी साखर असलेला आहार घ्या.

नियमित व्यायाम करणे

नियमित व्यायाम करा. धावणे, जॉगिंग करणे आणि योगासने करणे तुमच्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे शरीरात रक्तप्रवाह सुरळीत राहतो. वर्कआउट केल्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चमक स्पष्टपणे पाहू शकता.

सनस्क्रीन लावा

घरातून बाहेर पडताना किमान १५ SPF असलेले सनस्क्रीन लावायला विसरू नका. हे तुमच्या त्वचेचे धोकादायक UVA आणि UVB किरणांपासून (लाँग वेव्ह अल्ट्राव्हायोलेट A (UVA) आणि शॉर्ट वेव्ह अल्ट्राव्हायोलेट B (UVB) पासून संरक्षण करेल. सूर्याच्या या हानिकारक किरणांमुळे वयाच्या आधी सुरकुत्या, डाग आणि त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात. हे लक्षात ठेवा. तुम्ही खरेदी करत असलेल्या सनस्क्रीनवर नॉनकॉमेडोजेनिक किंवा नॉनॅकनेजेनिक किंवा हायफेनेटेड नॉन-अ‍ॅक्नेजेनिक असे लिहिलेले असावे जेणेकरून ते तुमच्या त्वचेची छिद्रे बंद करणार नाही.

पुरेशी झोप घ्या

तुमच्या शरीराला किमान ८ तासांची झोप आवश्यक आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुमचे शरीर थकलेले दिसेल. आठवड्यातून दोन किंवा तीनदा मध चेहऱ्यावर लावा जेणेकरून ते नैसर्गिकरित्या बरे होईल.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना त्वचा संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.)