पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूत केस गळणे, कोंडा होणे आणि केसांना फाटे फुटणे या समस्या खूप वाढतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही या ऋतूत केस कलर करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या ऋतूमध्ये केसांना कलर करण्याआधी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे कारण या ऋतूमध्ये केस अधिक खराब होतात. या व्यतिरिक्त या ऋतूमध्ये केसांचा रंगही चांगला चढत नाही. अशा परिस्थितीत केसांना कलर करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे जाणून घेऊया.

पावसाळ्यात केसांना कलर करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा

  • हेअर कलरच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या

पावसाळ्यात केसांना कलर करण्याआधी तुम्ही निवडत असलेल्या रंगाचा दर्जा चांगला आहे की नाही याकडे लक्ष द्या. यासाठी केसांना कलर लावण्याआधी पॅच टेस्ट करा कारण या कलरच्या वापरामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.

Photos : ‘हे’ तेल केसांसाठी आहेत अतिशय हानिकारक; आजच थांबवा वापर

  • केस कलर करण्याआधी केसांना तेल लावा

केस कलर करण्याच्या एक ते दोन दिवस आधी केसांना तेलाने चांगले मसाज करा कारण तेल केसांना पोषण देते आणि त्यांना मजबूत बनवते. त्यामुळे केस खराब होत नाहीत आणि कलर केल्यानंतर कोरडेही होत नाहीत. त्याचवेळी, पावसाळ्यात केसांची चमक निघून जाते, त्यामुळे केसांना तेलाने मसाज करणे आवश्यक आहे.

  • डोळ्यांना होणाऱ्या नुकसानाकडे लक्ष द्या

पावसाळ्यात त्वचेसोबतच डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत, संसर्गाच्या वेळी डोळ्यात कलर जाता कामा नये. कारण केसांचा रंग तुमच्या डोळ्यांचा संसर्ग अनेक पटींनी वाढवू शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)