उद्यापासून श्रावण महिना सुरु होत आहे आणि आषाढ महिना संपणार आहे. श्रावण सुरु झाल्यानंतर अनेकजण मांसाहार टाळतात. तुम्ही जर अशा लोकांपैकी असाल की ज्यांना श्रावण महिन्यात मांसाहार करत नाहीत आणि तुम्हाला अंडे-चिकण- मटण- मासे खायला आवडतात तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे.
तुम्हाला जर घरच्या घरी हॉटेलसारखी आणि चविष्ट हैद्राबादी चिकन बिर्याणी खायची असेल तर चिंता करू नका. ही सोपी रेसिपी वापरून झटपट शिजवा बिर्याणी. पारंपारिक पद्धतीत बिर्याणी बनवण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागते, परंतु प्रेशर कुकरचा वापर करून केवळ एका शिट्टीत मऊ आणि मोकळी बिर्याणी तयार करण्याची ही सोपी पाककृती नक्की वापरून पाहा.
रेस्टॉरंट स्टाईल लज्जतदार हैद्राबादी चिकन बिर्याणी
साहित्य (Ingredients):
मॅरिनेशन साठीचे साहित्य (Marination Ingredients)
- चिकन – १ किलो
- मीठ – १ चमचा
- आलं लसूण पेस्ट – २ चमचे
- हळद – अर्धा चमचा
- धने पावडर – १ टीस्पून
- लाल तिखट – १ टीस्पून
- कश्मीरी लाल तिखट – १ टीस्पून
- गरम मसाला – अर्धा टीस्पून
- जिरेपूड – अर्धा टीस्पून
- काळी मिरी पावडर – अर्धा टीस्पून
- बिर्याणी मसाला – २ टीस्पून
- वेलची – ३
- दालचिनी – १ तुकडा
- काळी मिरी – ८ ते १०
- लवंग – ३ ते ४
- तेल – २ चमचे
- दही – दीड कप
इतर साहित्य (Other Ingredients)
- बासमती तांदूळ – १ किलो
- आडवे कापलेले कांदे – २
- तमालपत्र – २
- टोमॅटो प्युरी – २ टोमॅटो
- हिरव्या मिरच्या – ३
- पुदिना – आवश्यकतेनुसार
- कोथिंबीर – आवश्यकतेनुसार
तांदूळ शिजवण्यासाठी (For Cooking Rice)
- जिरे – अर्धा चमचा
- काळी मिरी – ५ ते ६
- स्टारफुल – १
- वेलची – २ ते ३
- दालचिनी – छोटासा तुकडा
- लवंग – ३ ते ४
- तमालपत्र – २
- आलं लसूण पेस्ट – अर्धा चमचा
- आल्याचे तुकडे – २
- हिरवी मिरची – १
- कापलेला कांदा – आवश्यकतेनुसार
- मीठ – चवीनुसार
- लिंबाचा रस – १ लिंबू
- पुदिना – आवश्यकतेनुसार
- कोथिंबीर – आवश्यकतेनुसार
मॅरिनेशन आणि पूर्वतयारी (Marination and Preparation)
स्वच्छ धुतलेल्या चिकनमध्ये मीठ, आलं-लसूण पेस्ट, हळद, धने पावडर, लाल तिखट, कश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड, काळी मिरी पावडर, बिर्याणी मसाला, खडे मसाले (वेलची, दालचिनी, काळी मिरी, लवंग), तेल आणि दही घालून सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यावेत. हे मॅरिनेट केलेले चिकन किमान ३० मिनिटे झाकून ठेवावे.
भाताची तयारी आणि शिजवणे (Rice Preparation and Cooking)
बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन भिजवत ठेवावा. त्यानंतर पाणी गरम करून त्यात जिरे, काळी मिरी, चक्रफूल, वेलची, दालचिनी, लवंग, तमालपत्र, आलं-लसूण पेस्ट, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, कापलेला कांदा, मीठ, लिंबाचा रस, पुदिना आणि कोथिंबीर घालून तांदूळ ७०-८०% थोडा अर्धवट शिजवून घ्यावा.
चिकन शिजवणे आणि थर लावणे (Cooking Chicken and Layering)
प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात आडवे कापलेले कांदे, तमालपत्र, हिरव्या मिरच्या परतून घ्याव्यात. त्यात टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतावे. आता मॅरिनेट केलेले चिकन घालून ५ ते ६ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे. चिकन शिजल्यावर त्यावर अर्धा शिजवलेला बासमती तांदूळ पसरवून थर द्यावा. वरून पुदिना व कोथिंबीर टाकावी.
एक शिट्टी आणि सर्व्हिंग (One Whistle and Serving)
कुकरचे झाकण लावून मोठ्या आचेवर फक्त १ शिट्टी काढावी आणि गॅस बंद करावा. वाफ पूर्ण निघून गेल्यानंतर झाकण उघडून बिर्याणी हलक्या हाताने मोकळी करावी आणि गरमागरम सर्व्ह करावी. आखाड संपण्यापूर्वी कोशिंबीरसोबत गरमा गरम बिर्याणीवर ताव मारा.
