scorecardresearch

Lemon Water Benefits: उन्हाळ्यात दररोज १ ग्लास लिंबूपाणी पिण्याचे ‘हे’ आहेत उत्तम फायदे, जाणून घ्या

आपल्या संपूर्ण दिवसाच्या धावपळीसाठी शरीर निरोगी आणि सक्रिय असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आता दिवसाची सुरुवात कशाने करायची असा प्रश्न पडतो.

सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. (photo credit: jansatta)

दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो असं म्हणतात. तसेच आपल्या संपूर्ण दिवसाच्या धावपळीसाठी शरीर निरोगी आणि सक्रिय असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आता दिवसाची सुरुवात कशाने करायची असा प्रश्न पडतो.

बहुतेकजण त्यांच्या दिवसाची सुरुवात कॉफी किंवा चहाने करतात. परंतु, तुम्हाला हवे असल्यास, गरम पाण्यात लिंबाचे काही थेंब टाकून तुम्ही हे हेल्दी ड्रिंक तुमच्या दैनंदिन दिनचर्याचा एक भाग बनवू शकता. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. चला जाणून घेऊया लिंबूपाणी कधी प्यावे आणि त्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्याच वेळी, तज्ञ दिवसातून किमान १-२ वेळा लिंबूपाणी पिण्याची शिफारस करतात. यापेक्षा जास्त लिंबूपाणी पिऊ नका कारण ते आरोग्याला हानी पोहोचवते.

लिंबू पाणी पिण्याचे फायदे

उन्हाळ्यात एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही आणि अशक्तपणा, चक्कर येणे यासारख्या समस्यांपासून बचाव होतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात एक ग्लास लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

लिंबू पाणी प्यायल्याने किडनी साफ होते, तसेच वारंवार लघवी होण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय स्टोनच्या समस्येवर मात करण्यास देखील मदत होते.

लिंबू पाणी चयापचय वाढवते, जे वजन कमी करण्यास मदत करते. तुमचे शरीर हायड्रेटेड राहिल्यास शरीरातील फॅटही सहज जळते.

लिंबू पोटॅशियमने समृद्ध आहे, जे हृदयासाठी तसेच मज्जासंस्थेसाठी चांगले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Benefits of drinking 1 glass of lemon water every day in the summer season many diseases will remain away scsm

ताज्या बातम्या