बरेचदा लोक सकाळी उठल्यावर गरम पाणी पितात. गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का, की सकाळी गरम पाणी पिण्याऐवजी रात्री झोपताना गरम पाणी प्यायल्यास, आरोग्याशी संबंधित अनेक बदल दुसऱ्या दिवशी दिसू शकतात. आज आपण रात्री गरम पाणी पिऊन झोपल्यास शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

रात्री गरम पाणी पिण्याचे फायदे

  • रात्री झोपताना गरम पाणी प्यायल्याने शरीराचे अंतर्गत तापमान वाढते. यामुळे घाम येऊन शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तसेच, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

Photos : आपल्या ओठांचा रंग गुलाबी का आहे? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण

Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…
  • पचनक्रिया सुधारण्यासाठीही रात्री गरम पाणी पिऊन झोपणे फायदेशीर आहे. याच्या सेवनाने पचनसंस्था तर मजबूत होतेच पण बद्धकोष्ठता, गॅस इत्यादी समस्यांपासूनही आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने दुसऱ्या दिवशी पोट साफ होते.
  • जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याचे सेवन करावे. वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याचे सेवन करावे.
  • रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याचे सेवन केल्याने निद्रानाशाच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते. गरम पाणी प्यायल्याने चांगली झोप येते. निरोगी व्यक्तीला किमान ८ ते ९ तासांची झोप आवश्यक असते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)