3 Benefits Of Eating 2 Green Chilli Daily With Meals : हिरव्या मिरच्या जेवणाची चव वाढवण्याचे काम करतात असा अनेकांचा समज आहे. पण, हिरव्या मिरच्यांचे फायदे त्याहूनही अधिक आहेत. हिरव्या मिरच्या हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले सुपरफूड आहे. ज्यात कॅप्सेसिन नावाचे एक विशेष रसायन असते. हे आपल्या शरीरात थर्मोजेनेसिस, अर्थात उष्णता निर्मितीची प्रक्रिया किंचित वाढवते. सोप्या भाषेत सांगायचे तर मिरच्या खाल्ल्यानंतर आपले शरीर उबदारपणा राखण्यासाठी काही अतिरिक्त कॅलरीज खर्च करते.
यावर आहारतज्ज्ञ लिमा महाजन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तुम्ही दररोज जेवणाबरोबर दोन हिरव्या मिरच्या खाल्ल्याने काय होते हे स्पष्ट केले आहे.
हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
हिरव्या मिरच्यांच्या पांढऱ्या भागात वजन कमी करणारे कॅप्सेसिन हे संयुग असते, जे थर्मोजेनेसिस वाढवते, ज्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा बर्न करण्यास मदत होते. हिरव्या मिरच्या चयापचयदेखील वाढवतात. डायजेस्टिव एंझाइम आणि गॅस्ट्रिक ज्यूस स्टिम्यूलेट करून पचनक्रिया सुधारते.
व्हिटॅमिन सीने समृद्ध
१०० ग्रॅम हिरव्या मिरच्यांमध्ये लिंबापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते, जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि कोलेजन उत्पादन वाढवण्यासाठी प्रभावी ठरते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांसाठी हिरव्या मिरच्या अत्यंत फायदेशीर आहेत.
रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास उपयुक्त
आहारतज्ज्ञांच्या मते, हिरव्या मिरच्यांमध्ये असलेले कॅप्सेसिन इन्सुलिन रिस्पॉन्स सुधारू शकते, ज्यामुळे जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर ग्लुकोज स्पाइक होत नाही.
हिरवी मिरची कोणी खाऊ नये?
आहारतज्ज्ञांच्या मते, हिरव्या मिरच्या निश्चितच फायदेशीर आहेत, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. शिवाय अॅसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडी, पोटात अल्सर, पचनसंस्थेसंबंधित त्रास आणि मूळव्याध यांसारखा त्रास असल्यास हिरव्या मिरच्या खाणे टाळणे किंवा मर्यादित सेवन करणे महत्त्वाचे आहे.
(टीप – कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
