Healthy Foods: आवळ्याला सुपरफूड म्हणतात. हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेलाही अनेक फायदे देते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, चांगली त्वचा, सुंदर केस आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी आवळा देखील आहाराचा एक भाग बनवला जाऊ शकतो. परंतु, बहुतेकदा लोकांना आवळ्याचे फायदे माहित असतात परंतु ते त्यांच्या आहारात कसे समाविष्ट करावे किंवा ते कसे सेवन करावे हे समजण्यास असतात. कच्चा आवळा चवीला खूप आंबट असतो तर साधा शिजवलेला आवळा अनेकांना आवडत नाही. अशा परिस्थितीत आवळा हा आहाराचा भाग कसा बनवायचा आणि आवळ्यापासून बनवलेले काही स्वादिष्ट पदार्थ कसे बनवायचे याबद्दल येथे जाणून घ्या.

हर्बल चहा
आवळा हर्बल चहा बनवणे खूप सोपे आहे आणि ते प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. आवळा हर्बल चहा बनवण्यासाठी आवळ्याचे छोटे तुकडे करून पाण्यात उकळवा. जर चहा खूप आंबट वाटत असेल तर त्यात थोडे मध देखील घालता येईल.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
How does Set dosa differ from Benne dosa (1)
सेट डोसा हा बेन्ने डोसापेक्षा वेगळा कसा आहे? कोणता डोसा आहे आरोग्यदायी? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार

हेही वाचा – अंड्याचे कवच टाकून देताय? गार्डनिंगपासून भांडी साफ करण्यापर्यंत ‘असा’ करू शकता वापर, जाणून घ्या मजेशीर हॅक्स

सॅलड
आवळा सॅलड बनवण्याऐवजी आवळ्याचा रस तुमच्या कोणत्याही आंब्याच्या सॅलडमध्ये वापरता येईल. लिंबाच्या रसाऐवजी आवळ्याचा रस सॅलड ड्रेसिंगसाठी वापरा. यामुळे सॅलडची चवही वाढेल आणि आरोग्यासाठी आवळ्याचे पूर्ण फायदेही तुम्हाला मिळतील.

आवळा मुरांबा
आवळ्याचा मुरांबा चवीला गोड आणि आंबट असतो, त्यामुळे त्याचा एकाच वेळी जास्त वापर केला जात नाही. आवळा मुरांबा बनवण्यासाठी प्रथम साखर किंवा गुळाचे सरबत बनवा. त्यात उकडलेला आवळा घाला आणि काही वेळ सिरपमध्ये बुडवून ठेवा. तुमचा आवळा मुरांबा तयार आहे.

हेही वाचा – बाजारातून आणलेले रताळे दुसऱ्याच दिवशी खराब होतात? खरेदी करण्याच्या ट्रिक्स जाणून घ्या, जास्त दिवस राहतील ताजे

आवळा डिटॉक्स वॉटर
आवळा सेवन करण्याचा दुसरा पर्यायात म्हणजे एका ग्लास पाण्यात २ चमचे आवळ्याचा रस मिसळून प्या. हे आवळा पाणी सकाळी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये निघून जातात, पोटाच्या समस्या दूर होतात आणि वजन कमी करण्यावर त्याचा परिणाम दिसून येतो.