जेवणात भरपूर तिखट टाकून बनवलेले झणझणीत पदार्थ अनेकांना आवडतात. अशा पदार्थांवर आपण ताव मारतो खरं, मात्र नंतर याचा त्रास होऊ लागतो. जेवण झाल्यानंतर काही तासांनी पोटात-छातीत जळजळ व्हायला लागते. अनेकांना नंतर अपचनाचाही त्रास होतो. आता असा त्रास होऊ द्यायचा नसेल, पण जेवणही छान तिखट, मसालेदार, झणझणीत करायचं असेल, तर अभिनेत्री भाग्यश्रीने काही टिप्स आपल्या चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. तिने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये तिने हिरवी मिरची खाण्याचे फायदे सांगितले आहेत.

हिरवी मिरची खाल्ल्याने तब्येतीला काही फायदा होऊ शकतो, असा विचारही आपण कधी केला नसेल. पण हिरवी मिरची खाणे अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्हालाही तिखट खायला आवडत असेल तर स्वयंपाकात लाल मसाल्याऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करा. यामुळे जेवणाला चवही येईल आणि अशा तिखट जेवणाचा त्रासही होणार नाही, असं भाग्यश्री सांगते.

Breast Cancer: त्वचेवर असलेल्या तीळांमुळे महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो का? जाणून घ्या यामागचे सत्य

याविषयी सांगताना ती म्हणाली की, तिखट करण्यासाठी मिरचीवर बरीच प्रक्रिया केली जाते. यामुळे जे पौष्टिक घटक हिरव्या मिरचीतून मिळतात, ते लाल मिरचीतून मिळत नाहीत. शिवाय लाल तिखटामध्ये भेसळ असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे अनेकांना लाल तिखट जास्त खाल्ल्यानंतर अल्सर, जळजळ असा त्रास होतो.

h

हिरवी मिरची खाण्याचे फायदे 

  • हिरव्या मिरचीमध्ये असणारे बिटा कॅरोटीन डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
  • हिरव्या मिरचीतून व्हिटॅमिन के मिळते.
  • हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते.
  • कॅप्सेसिनन आणि डायहायड्रॉकॅप्सेसिनन हे दोन घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास तसेच रक्तवाहिन्यांमधील फॅट्स कमी करण्यास मदत करतात.
  • यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडेन्ट असल्याने कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)