scorecardresearch

Honey : रात्री झोपण्यापर्वी १ चमचा मध खा, मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

मधात ग्लुकोज असल्याने त्याने उर्जा मिळते, तसेच त्यात अँटिऑक्सिडेंट असल्याने ते मधुमेह नियंत्रणात ठेवू शकते. झोपण्यापूर्वी १ चमचा मध खालल्याने शरीराला काय फायदे मिळतात याबाबत जाणून घेऊया.

Honey : रात्री झोपण्यापर्वी १ चमचा मध खा, मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
मध

मध हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हे गोड पदार्थ अनेक आजारांपासून तुमचे संरक्षण करू शकते. मधापासून शरीराला कॅल्शियम मिळते जे दातांना आणि हाडांना मजबूत करण्यात मदत करते. मधात ग्लुकोज असल्याने त्याने उर्जा मिळते, तसेच त्यात अँटिऑक्सिडेंट असल्याने ते मधुमेह नियंत्रणात ठेवू शकते. झोपण्यापूर्वी १ चमचा मध खालल्याने शरीराला काय फायदे मिळतात याबाबत जाणून घेऊया.

१) रोग प्रतिकारक शक्ती वाढते

रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा मध टाकून ते प्या. मधात अँटिऑक्सिडेंट असतात जे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात. रोग प्रतिकार शक्तीने एलर्जी आणि जंतूसंसर्गापासून बचाव होतो.

२) वजन कमी करू शकते

रात्री झोण्यापूर्वी कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्याने चरबी घालवण्यात मदत होते. त्यामुळे वजन कमी होऊ शकते. आवश्यक्तेपेक्षा अधिक वजन हे इतर अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते.

३) त्वचा निरोगी राहाते

मध त्वचा निरोगी राखण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी मध खालल्याने तुमच्या चेहऱ्यावर उजळ येऊ शकते. पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. दमट आणि ओलसर वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो.

४) केस वाढवण्यासाठी फायदेशीर

मधात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे केसांसंबंधी समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत करतात. मधाने केस वेगाने वाढतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध घ्या.

५) खोकला कमी करण्यास मदत करते

रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध खालल्यास खोकल्याच्या त्रास कमी होऊ शकतो. मधात अँटिबॅक्टेरियल गुण असतात जे कफ बाहेर काढण्यात मदत करतात. खोकल्याची समस्येपासून सुटका मिळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी १ चम्मच मध पाण्यासह घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Benefits of eating honey before sleeping ssb

ताज्या बातम्या