Benefits Of Eating Jamun: वटपौर्णिमा व त्याआधी काही दिवसांपासून बाजारात जांभूळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले दिसतात. आंबट गोड चवीची जांभळे खायची मज्जाच काही और असते. पण नुसतं चवीपुरतं नाही तर जांभूळ हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा सुपरफूड म्हणून सिद्ध होऊ शकते. अभ्यासानुसार जांभळाचे अनेक औषधी आणि आरोग्य फायदे आहेत. हे सुपरफूड ज्यूस, व्हिनेगर, गोळ्या, कॅप्सूल आणि चूर्ण यांसारख्या इतर प्रकारांमध्ये सेवन केले जाऊ शकते, या सर्वांमध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जांभळामध्ये पाणी, प्रथिने, लिपिड्स (फॅट्स), कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ए यासारखी पोषक सत्व असतात. त्यामुळे आपल्या शरीराला काय व कसा फायदा होऊ शकतो हे आधी पाहूया…

जांभूळ खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Jamun)

  1. जांभूळ फळामध्ये पोटॅशियमचे प्रमाण मुबलक असल्याने असते जे स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब टाळण्यास मदत करते.
  2. जांभळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे मुक्त रॅडिकल पेशींविरुद्ध काम करतात जे अनेकदा कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस चालना देतात.
  3. जांभूळ फळामध्ये पोषक जीवनसत्त्वे असतात जी तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
  4. अभ्यासानुसार जांभूळ खाल्ल्याने त्वचेत कोलेजन तयार होण्यास मदत होऊ शकते.
  5. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सेवन केल्याने तुम्हाला खूप आराम मिळू शकते.
  6. जांभूळ फळामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन सी असते जे खोकला आणि श्वसनाच्या इतर गुंतागुंत टाळण्यास मदत करू शकतात.
  7. जांभूळ दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे.

जांभूळ खाण्याची योग्य वेळ कोणती? (Right Time To Eat Jamun)

जांभूळ अत्यंत आरोग्यदायी आहे आणि ते दिवसाच्या कोणत्याही वेळी खाऊ शकतो. मात्र, रिकाम्या पोटी जांभूळ खाणे टाळावे. जांभूळ खाण्याची सर्वात फायदेशीर वेळ जेवणानंतरची म्हणता येईल कारण यामुळे पचनास मदत होऊ शकते.

हे ही वाचा<< आल्याचे तेल पोटावर लावून फॅट्स व वजन झपाट्याने कमी होते? आल्याच्या सेवनाबाबत तज्ज्ञांचं मत जाणून घ्या

जांभळाच्या सेवनाचे काही दुष्परिणाम आहेत का?

जांभळाचे अतिसेवन केल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो. तसेच यामुळे पचनास मदत होते हे जरी खरे असले तरी अतिसेवनाने बद्धकोष्ठचा त्रास जाणवू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of eating jambhul what is right time to eat jamun how much to eat in a day get healthy teeth and heart read here svs
First published on: 09-06-2023 at 16:16 IST