Popcorn and Makhana: वजन कमी करू इच्छिणारे लोक नेहमीच आरोग्यदायी, कमी कॅलरी आणि कमी चरबीयुक्त स्नॅक्सच्या शोधात असतात आणि मखाना व पॉपकॉर्न हे दोन्ही उत्तम स्नॅक्स आहेत. तथापि, बहुतेक लोकांना पॉपकॉर्नपेक्षा मखाना अधिक आरोग्यदायी वाटतो. मात्र, आरोग्यविषयक अहवाल याच्या उलट सूचित करतात. जर तुम्ही तुमची संध्याकाळची भूक भागवण्यासाठी हलका आणि आरोग्यदायी स्नॅक्स शोधत असाल, तर तुम्ही कोणता निवडावा? जर तुम्ही गोंधळात असाल तर हे वाचा. पॉपकॉर्न की मखाना, यापैकी काय निवडावे हे आज आपण जाणून घेऊ

मखाना हा अनेक आरोग्यदायी फायदे असलेला पोषक तत्त्वांनी समृद्ध नाश्ता आहे. मखाना मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास, यकृतातील विषारी घटक काढून टाकण्यास आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतो.

मखाना आणि पॉपकॉर्नमधील पोषक तत्त्वे

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय पोषण संस्थेने मखाना आणि पॉपकॉर्नच्या पौष्टिक मूल्यांची यादी दिली आहे. ही माहिती जाणून घेतल्यास, तुमच्यासाठी कोणते अधिक फायदेशीर आहे हे ठरविण्यात मदत होऊ शकते.

मखान्याचे पौष्टिक मूल्य

  • कॅलरीज- ३४७ ग्रॅम
  • प्रथिने – ९-१० ग्रॅम
  • फायबर ७१४ ग्रॅम, कॅल्शियम ५०-६० ग्रॅम
  • लोह – १.४ ते १.६ ग्रॅम
  • पोटेशियम ३५० ते ५०० मिग्रॅ

पॉपकॉर्नचे पौष्टिक मूल्य

  • कॅलरीज ३८० ग्रॅम
  • प्रथिने – ११-१३ ग्रॅम
  • फायबर १४ ग्रॅम
  • कॅल्शियम – ७-१० मिग्रॅ
  • लोह – ३ ग्रॅम
  • पोटॅशियम ३०० मिग्रॅ

पॉपकॉर्न आणि मखाना यांपैकी काय चांगलं आहे?

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी पॉपकॉर्न खाण्याचा विचार करत असाल, तर मखान्याऐवजी पॉपकॉर्न निवडणे अधिक चांगले आहे. पॉपकॉर्नमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवण्यास मदत करते. परंतु, ते बनवताना त्यात बटर, मीठ किंवा अतिरिक्त फ्लेवर्स नसावेत. तरीही मखाना किंवा पॉपकॉर्न खाताना त्याचे प्रमाण विचारात घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर पॉपकॉर्न हा एक चांगला पर्याय असू शकतो, कारण तो केवळ किफायतशीरच नाही, तर त्यात मखान्यापेक्षा जास्त कॅलरीज आणि अधिक प्रथिनेदेखील असतात. शिवाय, पॉपकॉर्नमध्ये फायबर भरपूर असल्याने अगदी थोड्या प्रमाणात खाल्ल्यावरही तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटू शकते.