दैनंदिन आहारात सर्व भाज्यांचा आणि फळांचा समावेश असावा असे आपण अनेकदा ऐकतो. परंतु एखादा पदार्थ समोर आला की मात्र आपल्या कपाळावर आठ्या येतात. सध्या टोमॅटो त्याच्या किंमतीवरुन चांगलेच चर्चेत आहेत. श्रीमंतांची भाजी अशी ओळख झालेला टोमॅटो भाजीच्या ग्रेव्हीसाठी तर कधी सॅलाड म्हणून जेवण बनवताना लागतोच. काही नाही तर किमान टोमॅटोचा सॉस तरी असतोच. अनेकदा टोमॅटोत बिया असल्याने ज्यांना किडणी स्टोनचा त्रास आहे त्यांना टोमॅटो न खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र एरवी हा टोमॅटो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. पाहूयात काय आहेत टोमॅटो खाण्याचे फायदे…
१. टोमॅटोच्या लाल रंगाने सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होण्यास मदत होते. तसेच टो़मॅटो कॅन्सरच्या टयूमरला नष्ट करण्यासही मदत होते.




२. टोमॅटो खाण्याने कॅन्सर होण्याची शक्यता ५० टक्के कमी असते असं एका संशोधनातून समोर आलं आहे. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे रसायन असते ज्याचा कर्करोगाशी लढा देण्यासही उपयोग होतो.
३. टो़मॅटो खाल्ल्याने पोटाचा कॅन्सर कमी होण्यास मदत होते. तसेच स्तन आणि इतर कॅन्सर कमी करण्यासही टोमॅटोची मदत होते.
४. मिरची, गाजर आणि बटाट्याचं सेवनानेही महिलांचे गर्भाशयाचे कॅन्सर कमी करण्यास मदत होते. तर लसूण स्तन आणि पोटाच्या कॅन्सरला बरा करण्यासाठी उपयुक्त असतो.
(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)