benefits of ghee to body to keep it healthy | Loksatta

शौचाशी संबंधित ‘या’ समस्या दूर होण्यास मदत करते तूप, जाणून घ्या इतर फायदे

तूप हे जेवण पचवण्यात मदत करते. तसेच ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यातही मदत करते. तूप खाण्याचे अजून कोणते फायदे आहेत याबाबत आपण जाणून घेऊया.

शौचाशी संबंधित ‘या’ समस्या दूर होण्यास मदत करते तूप, जाणून घ्या इतर फायदे
तूप ( फोटो : file photo)

तूप हे जेवणाची चव वाढवते. त्यातील पोषक तत्व हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. तुपामध्ये भरपूर प्रमामात फॅट आढळते. तसेच यात जीवनसत्व अ, क, ई हे जीवनसत्व असतात. तसेच यात ब्युटिरिक अ‍ॅसिड देखील आहे. तूप हे जेवण पचवण्यात मदत करते. तसेच ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यातही मदत करते. तूप खाण्याचे अजून कोणते फायदे आहेत, याबाबत आपण जाणून घेऊया.

१) अन्न पचवण्यास मदत करते

तूप खालल्याने आपल्या शरीराला अनेक लाभ मिळतात. ते आपले पाचनतंत्र ठीक राखण्यात मदत करते. तुपाच्या सेवनाने आतड्या चांगल्या पद्धतीने काम करतात. तुपाच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि मूळव्याध या सारख्या समस्या दूर होण्यास सुद्धा मदत होते.

(सहज उपलब्ध असणारे ‘हे’ द्रव्य उच्च रक्तदाब नियंत्रणात आणू शकते)

२) शरीराला निरोगी ठेवते तूप

तुपामध्ये अनेक जीवनसत्वे असतात जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. तुपातील विटामीन ई केस मजबूत ठेवण्यात मदत करतात. तसेच तुपाने केसांमध्ये डँड्रफ आणि खाजेची समस्या देखील होत नाही. जे लोक नियमित तुपाचे सेवन करतात त्यांचे दात देखील मजबूत राहातात.

३) तुपाने भूख आणि झोप वाढते

तूप आपली झोप आणि भूक देखील वाढवण्यास मदत करते. रोज एक चम्मच तूप टाकलेले अन्न खालल्यास झोप येऊ शकते.

४) तुपाने त्वचा चांगली राहाते, हाडे मजबूत होतात

तुपाचे सेवन केल्याने त्वचेला उजळ येतो. दररोज तुपाचे सेवन केल्याने त्वचा सुंदर होऊ शकते. तुपाने हाडे मजबूत होतात. लहान मुलांना तुप खाऊ घालणे फायदेशीर ठरू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पसंतीची वरात… साडी घ्या साडी!

संबंधित बातम्या

बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?
Akshaya Tritiya 2022: कधी आहे अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त? जाणून घ्या
स्मार्ट लोकांमध्ये असतात ‘या’ ५ सवयी; तुम्ही त्या लिस्टमध्ये आहात का? जाणून घ्या
‘या’ तीन आजारांमध्ये मनुके ठरतात तुमचे शत्रू! डॉक्टरांकडून जाणून घ्या काळे मनुके भिजवून खावे की सुके?
अल्कोहोलचे नियंत्रित सेवन आरोग्यासाठी हितकारक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA World Cup 2022 : कोरिया बाद फेरीत, उरुग्वेचे आव्हान संपुष्टात
FIFA World Cup 2022: अर्जेटिनाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे दिलासा
न्यायवृंद व्यवस्था पारदर्शकच; ती कोलमडून पडू नये; सर्वोच्च न्यायालयाचे मत
मंत्र्यांना बेळगावात पाठवू नका! ; कर्नाटकचे महाराष्ट्राला पत्र; चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई दौऱ्यावर ठाम