Cholesterol control tips: आजच्या धावपळीच्या जीवनात कोलेस्ट्रॉल ही एक सामान्य समस्या बनली आहे. शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित इतर अनेक समस्यादेखील उदभवू शकतात.शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे अयोग्य खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली. म्हणून कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे आवश्यक आहे. आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी काही घटकांपासून बनवलेले पाणी प्यायलात, तर शरीरात साचलेल्या घाणीसोबतच कोलेस्ट्रॉलदेखील लवकर बाहेर पडते. आयुर्वेदिक व युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी म्हणाले की, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आल्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते.

डॉ. सलीम झैदी यांनी स्पष्ट केले की, कोलेस्ट्रॉल हा शरीराच्या पेशींमध्ये आढळणारा मेणासारखा, चरबीसारखा एक घटक आहे. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असल्याने ते नसांमध्ये जमा होऊ शकते. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचल्याने रक्तप्रवाहात हळूहळू अडथळा निर्माण होतो आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आले खूप फायदेशीर ठरू शकते. आल्याचा योग्य वापर हृदयासह इतर आरोग्यासाठीही अनेक फायदे देऊ शकतो.

कोलेस्ट्रॉलसाठी रिकाम्या पोटी खा

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी लोक औषधांपासून ते जीवनशैलीतील बदलांपर्यंत आणि अगदी नावीन्यपूर्ण घरगुती उपचारांपर्यंत सर्व काही वापरून पाहतात. तुमच्या स्वयंपाकघरात नेहमीच आढळणारे आले कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी एक रामबाण उपायदेखील ठरू शकतो. आले हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. आल्याचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण- त्यात असलेले जिंजरॉलसारखी बायोअॅक्टिव्ह संयुगे एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करू शकतात.

आल्याचे पाणी कसे बनवायचे?

आल्याचे पाणी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी ठेवा आणि ते चुलीवर ठेवा. गॅस चालू करा आणि त्यात धुतलेले व चिरलेले आले घाला. त्या पाण्याला उकळी येऊ द्या. जेव्हा पाणी अर्धे म्हणजेच एक कप होईल तेव्हा ते गाळून चहासारखे प्या.

सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिण्याचे फायदे

सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ते पचन, जळजळ आणि हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच वजन कमी करण्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासही मदत करू शकते.

पचन सुधारणे

पचनाच्या समस्या असलेल्यांनी दररोज आल्याचे पाणी प्यावे. आल्याचे पाणी पोटातील वायू, आम्लता व पोट फुगणे यांवर उपचार करण्यास मदत करते. दररोज आल्याच्या पाण्याचे सेवन केल्याने पोटात पाचक एंझाइम्सचा स्राव वाढतो.

वजन नियंत्रण

आल्याचे पाणी पिणे वजन नियंत्रणासाठीदेखील प्रभावी आहे. आल्याचे पाणी नियमितपणे प्यायल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण- आल्यामध्ये अनेक संयुगे असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. हे शरीराच्या कॅलरीज बर्न करण्याच्या प्रक्रियेला चालना देतात. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, ज्या महिलांच्या कंबरेवर जास्त चरबी जमा होते. किंवा जर कंबरेवरील चरबीचे प्रमाण बिघडले, तर आले त्या लोकांमध्ये चरबी जाळण्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.