scorecardresearch

स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते डाळिंब, जाणून घ्या इतर आश्चर्यकारक फायदे

डाळिंबात फायबर, प्रथिने आणि जिवनसत्वांची मात्र अधिक आहे जे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यात मदत करते, तसेच ते कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता आणि वजन कमी करण्यात देखील मदत करते. डाळिंबा खाण्याचे अजून कोणते फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.

स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते डाळिंब, जाणून घ्या इतर आश्चर्यकारक फायदे
डाळिंबाचे फायदे

चवीला गोड असणारे डाळिंब हे फळ आरोग्यासाठी देखील लाभदायी आहे. ते पोषक तत्वांनी युक्त आहे. या फळात फायबर, प्रथिने आणि जिवनसत्वांची मात्रा अधिक आहे जे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यात मदत करते, तसेच ते कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता आणि वजन कमी करण्यात देखील मदत करते. डाळिंब खाण्याचे अजून कोणते फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.

सूज कमी करते

डाळिंबात अँटी इन्फ्लेमेटोरी गुण असून त्यात अँटिऑक्सिडेंट पदार्थ असतात जे सूज कमी करण्यास मदत करतात. डाळिंब हृदय रोग, कॅन्सर, टाईप २ डायबिटीज आणि अल्जाइमर सारख्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करते.

(इम्युनिटी वाढवण्यात मदत करतो आवळा, फक्त खाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा)

हृदयाचे आरोग्य जपते

डाळिंबामध्ये पॉलिफेनोलिक नावाचे तत्व असते जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. डाळिंबाचे ज्यूस ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते, तसेच ते हृदयविकाराचा धक्का आणि स्ट्रोकची समस्या टाळण्यासही मदत करू शकते.

भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात. ते फ्रि रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यास मदत करतात. या फळाचा आहारात समावेश केल्यास अनेक आजारांना रोखण्यास मदत होऊ शकते. डाळिंबात अँटि इन्फ्लेमेटोरी गुण असतात. ते सांधेदुखीची समस्या दूर करण्याचे काम करते. संधिवात रोखण्यासही मदत करते.

(‘हृदय’ आणि ‘हाडे’ मजबूत ठेवण्यासाठी आजपासूनच तुमच्या आहारात करा ‘या’ फळाचा समावेश)

स्मरणशक्ती सुधारते
डाळिंबाचा रस अतिशय चवदार असतो. याच्या नियमित सेवनाने तुमची स्मरणशक्तीही सुधारते. डाळिंबाच्या सेवनाने अल्झायमरलाही प्रतिबंध घालता येते. डाळिंब डोळ्यांची दृष्टी वाढण्यासही मदत करते.

पचन करण्यास मदत करते

पाचन तंत्र चांगले राखण्यासाठी फाइबरची आवश्यक्ता असते. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. या फळाचा आहारात समावेश केल्यास पाचनतंत्र संबंधी समस्यांपासून बचाव होऊ शकतो.

रोग प्रतिकार शक्ती वाढवते

अनारमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आहे. विटामिन सी इम्युनिटी वाढवण्याचे काम करते. हे फळ तुम्हाला अनेक आजार आणि संसर्गांपासून दूर ठेवू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Benefits of pomegranate fruit to body ssb

ताज्या बातम्या