बेनेली इंडियाने भारतात आपली सर्वात स्वस्त बाइक Imperiale 400 लाँच केली आहे. ही कंपनीची पहिलीच ‘क्लासिक’ बाइक आहे. या बाइकची एक्स-शोरुम किंमत 1.69 लाख रुपये असून इटलीच्या बेनेली कंपनीची भारतीय बाजारातील ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त बाइक असल्याचं सांगितलं जात आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाच बेनेलीने भारतात Leoncino 250 ही बाइक देखील लाँच केली होती. या बाइकची एक्स-शोरुम किंमत 2.5 लाख रुपये इतकी आहे. Imperiale 400 लाँच होईपर्यंत Leoncino 250 ही बेनेलीची भारतातील सर्वात परवडणारी बाइक होती. Royal Enfield Classic 350 आणि Jawa बाइक्ससोबत Imperiale 400 ची थेट स्पर्धा असेल.

नव्या बाइकसाठी देशभरातील कंपनीच्या डिलरशिपमध्ये व अधिकृत संकेतस्थळावर बुकिंगला सुरूवात झली आहे. चार हजार रुपयांमध्ये बाइकसाठी बुकिंग करता येईल. इम्पेरियल 400 ही बाइक 1950 मध्ये आलेल्या बेनेली-मोटोबी रेंजच्या प्रेरणेतून बनवण्यात आली आहे. नव्या बाइकमध्ये फ्युअल-इंजेक्शन तंत्रज्ञानासह 399cc क्षमतेचं SOHC सिंगल-सिलिंडर, फोर-स्ट्रोक, एअर-कूल्ड BS4 इंजिन आहे.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
BMW iX xDrive50 launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी इलेक्ट्रिक SUV देशात दाखल, सिंगल चार्जमध्ये धावते ६३५ किमी, पण किंमत तर…
Top Companies, Lose, Rs 1.97 Lakh Crore , market valuation, infosys, tcs, hdfc bank, hindustan unilever, finance, financial knowledge, financial year end,
आघाडीच्या १० कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना बाजारभांडवलात १.९७ लाख कोटींची घट

आणखी वाचा- Sherco-TVS कडून ‘डकार रॅली’साठी टीमची घोषणा, भारताचा रायडर हरिथ नोहा करणार पदार्पण

हे इंजिन 20 bhp ऊर्जा आणि 29 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. यात 6-स्पीड गिअरबॉक्सचा पर्यायही आहे. बाइकच्या खरेदीवर तीन वर्ष/अमर्यादित किलोमीटर वॉरंटी आणि पहिल्या दोन वर्षांसाठी मोफत सर्व्हिसिंग आहे. बाइकच्या पुढील भागात 41mm टेलिस्कोपिक फोर्क्स असून मागील बाजू प्रीलोड अॅडजस्टेबल ड्युअल शॉक अॅब्जॉर्बर आहे. याशिवाय पुढे 300mm डिस्कसह टू-पिस्टन फ्लोटिंग क्लिपर असून मागे 240mm डिस्कसह सिंगल-पिस्टन क्लिपर आहे. ड्युअल-चॅनल ABS चं फीचर देखील यात आहे. ही बाइक रेड, सिल्वर आणि ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये ही बाइक उपलब्ध आहे.