Besan chilla is good for breakfast: भारतातील प्रत्येक घरामध्ये गरमागरम बेसनाची पोळी सर्वोत्तम, आरामदायी आणि नेहमीचा नाश्ता म्हणून आवडीने खाल्ला जातो. बेसन पोळी बनवायला अत्यंत सोपी आहे, झटपट तयार होते आणि पोटही भरते. त्याशिवाय त्यात थोडासा बदल करून आरोग्यदायीही बनवता येते म्हणून त्याला आरोग्यदायी नाश्ता, असे म्हटले जाते. बेसनाची पोळी केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठी फायदेशीरही आहे. लोक अनेकदा बेसनामध्ये विविध भाज्या घालून पोळी बनवतात, ज्यामुळे त्यातील फायबर, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढते. पण, रोज नाश्त्यामध्ये बेसनाची पोळी खाल्ल्यास काय होईल? रोज बेसनाची पोळी खाल्ल्याने शरीराला फायदा होतो की काही नुकसान होते, हे आपण जाणून घेऊ…
रोज बेसन पोळी खाल्ली तर काय होते?
जर तुम्ही रोज नाश्त्यामध्ये बेसनाची पोळी खाल्ली, तर तुमचे शरीर अपेक्षित प्रतिसाद देऊ लागेल. त्यातील प्रथिने स्नायूंच्या दुरुस्तीस मदत करतील आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटेल. इतकेच नाही, तर रोज बेसन पोळी खाल्ल्याने दुपारच्या जेवणापूर्वी वारंवार लागणारी भूकदेखील टाळता येईल.
वजन नियंत्रणात मदत करेल
रोज नाश्त्यामध्ये बेसन पोळी खाल्ल्याने प्रथिने आणि फायबर यांचे मिश्रण मिळेल, ज्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल आणि खाण्याची लालसा कमी होण्यासही मदत होईल.
स्नायूंचे आरोग्य चांगले राहते
हा प्रथिनयुक्त नाश्ता स्नायूंचे आरोग्य सुधारतो आणि चयापचय क्रिया सक्रिय ठेवतो.
पचनाचे फायदे
पोळी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर मिळते, ज्यामुळे पोटातील निरोगी जीवाणूंना फायदा होतो. त्यामुळे पचनक्रियादेखील सुधारते.
बेसन पिठाची पोळी कशी बनवायची?
- बेसन पिठाची पोळी बनवताना तो कमी तेलात बनवावा हे लक्षात ठेवा.
- पोळी बनवण्यासाठी फक्त बेसन वापरू नका. त्याऐवजी त्यात पालक, शिमला मिरची, टोमॅटो, कांदे, गाजर आणि चीज इत्यादी घाला. तुम्ही दररोज वेगवेगळ्या भाज्या वापरूनही चिला बनवू शकता.
- मीठ कमी वापरा म्हणजे ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.
- बेसन पोळी हिरव्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खा.
ही काळजी घ्या
- बेसन पोळी पौष्टिक आहे; परंतु त्यातील सोडियमचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवर परिणाम होऊ शकतो.
- तसेच काही लोकांना बेसनाची अॅलर्जी असू शकते. बेसन जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटफुगी आणि गॅस होऊ शकतो.
- मधुमेह असलेले लोक त्यांच्या दैनंदिन आहारात बेसनाचा समावेश करू शकतात; परंतु संतुलित आहाराचा भाग म्हणून ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे.
