देशात नेटवर्क क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांचे प्रीपेड प्लान महागले आहेत. त्यामुळे रिफील संपल्यानंतर प्रत्येक जण आपल्या कंपनीच्या बेस्ट प्लानच्या शोधात आहे. प्लान खिशाला परवडण्याव्यतिरिक्त चांगला सुविधा मिळतील याकडे ग्राहकांचा कल आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे अनेक 4G प्लान आहेत. मात्र बहुतेक लोकांना कंपन्यांच्या प्लानबद्दल माहिती नाही. आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या सर्वोत्कृष्ट 4G प्री-पेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांचा अवधी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्स जिओ

  • जिओचा सर्वात स्वस्त प्लान २०९ रुपयांचा आहे. यात दररोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. त्यानंतर २३९ रुपयांचा प्लान आहे. १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानचा अवधी २८ दिवसांचा आहे.
  • जिओमध्ये ग्राहकांसाठी २९९ रुपयांचा प्लान आहे, ज्यामध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. यासाठी २८ दिवसांचा अवधी आहे.
  • जर तुम्हाला अधिक डेटा हवा असेल तर तुम्ही ६०१ रुपयांचा रिचार्ज करू शकता. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज ३ जीबी डेटा मिळेल. याशिवाय या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याचीही सुविधा आहे. या प्लॅनमध्ये ६ जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळेल.

व्होडाफोन आयडिया

  • व्होडाफोन आयडियाचा २८ दिवसांच्या वैधतेसह अनेक योजना आहेत, ज्यामध्ये १ जीबी, १.५ जीबी, २ जीबी, २.५ जीबी आणि ३ जीबी डेटा दररोज उपलब्ध आहे. या प्लॅनच्या किंमती अनुक्रमे २६९ रुपये, २९९ रुपये, ३५९ रुपये, ४०९ रुपये आणि ४७५ रुपये आहेत. सर्व प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा आहे. रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत सर्व प्लानसह अमर्यादित व्हिडिओ पाहण्याची सुविधा आहे.

Vodafone Idea: Vi नेटवर्क कंपनीने ग्राहकांसाठी आणले ४ स्वस्त प्रीपेड प्लान; वाचा

एअरटेल

  • एअरटेलकडेही जिओप्रमाणे 4G प्लान आहेत. एअरटेलच्या १७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि ३०० मेसेज मिळतात. एअरटेलचा २६५ रुपयांच्या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १ जीबी डेटा मिळतो. दुसरा प्लॅन २९९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि १.५ जीबी डेटा दररोज उपलब्ध आहे. या दोन्ही प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.
  • एअरटेलच्या ३५९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. तसेच अमर्यादित कॉलिंग आहे. एअरटेलचा ४४९ रुपयांचा २८ दिवसांचा प्लान देखील आहे. ज्यामध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. एअरटेलच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे.
  • या सर्व प्लानमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमचा सब्सक्रिप्शन मिळणार आहे. ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असेल.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best 4g prepaid plan of jio airtel vodafone idea for 28 days rmt
First published on: 20-12-2021 at 10:50 IST