चांगले आणि निरोगी शरीर आपल्याला चांगला आत्मविश्वास देते. वाढत्या वजनामुळे हा आत्मविश्वास कमकुवत होतो. झपाट्याने वाढणारे वजन लठ्ठपणाच्या आजारात रूपांतरित होते, त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वाढत्या लठ्ठपणामुळे शरीर मधुमेह, थायरॉईड, रक्तदाब अशा अनेक आजारांना बळी पडत आहे. त्यामुळे वाढत्या लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायाम आणि संयम असणे आवश्यक आहे.

व्यायामाचा अर्थ असा नाही की तुम्ही जिममध्ये जा आणि वर्कआउट करा, तुम्ही घरीही कॅलरीज बर्न करून लठ्ठपणा सहज नियंत्रित करू शकता. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, अनेक कार्डिओ व्यायाम प्रभावी आहेत, जे वजन वेगाने नियंत्रित करतात. सायकलिंग हा देखील इतका प्रभावी कार्डिओ व्यायाम आहे की सायकल चालवल्याने तुम्ही कॅलरी लवकर बर्न करून लठ्ठपणा नियंत्रित करू शकता.

Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

जरी तुम्ही मध्यम गतीने सायकल चालवली तरी एका तासात ६७५ कॅलरीज बर्न होऊ शकतात. सायकल चालवल्याने तुमच्या शरीरातील फॅट झपाट्याने कमी होईल. तर सायकलने वजन कसे कमी होते आणि ती चालवल्याने शरीराला काय फायदे होतात ते जाणून घेऊया.

हा व्यायाम वजन कमी करतो

सायकल चालवल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होतो, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. एका संशोधनानुसार, सुमारे ६ महिने सायकल चालवून १२ टक्के वजन कमी करता येते. या संशोधनात सहभागी महिलांना दिवसातून ६० मिनिटे चालणे, सायकल चालवणे आणि पोहण्यास असे प्रकार सांगण्यात आले. मात्र ज्यांनी सायकल चालवली त्यांचे वजन वेगाने कमी झाले.

कॅलरीज बर्न करतात

हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार, सुमारे १२ mph या मध्यम गतीने सायकल चालवल्याने सुमारे ७ कॅलरीज बर्न होऊ शकतात. सायकल चालवून किती वजन कमी करणे शक्य आहे याची कल्पना या आकड्यावरून येऊ शकते.

जलद वजन कमी करा

अमेरिकन जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमधील एका अभ्यासानुसार चालण्यापेक्षा सायकल चालवल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

स्नायूंना मजबूत बनवते

दररोज सायकलिंग केल्याने स्नायू मजबूत होतात, तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कायम राहते. जेव्हा तुम्ही सायकल चालवता, तेव्हा पाय पेडलिंग करताना पाय वरपासून खालपर्यंत सरकतात, ज्यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात.

तणाव दूर करते

वजन कमी करण्यासोबतच सायकलिंगमुळे तणावही दूर होतो. सायकल चालवल्याने मनाची स्थिती बदलते तसेच मेंदूला रक्तपुरवठा देखील चांगल्या पद्धतीने होतो.