नाताळ म्हणजेच येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव, सर्व जगभरात साजरा केला जातो. भारतात ज्या प्रमाणे दिवाळी किंवा ईद साजरी केली जाते तितक्याच मोठ्या प्रमाणात नाताळही साजरा केला जातो. हा सण ख्रिस्त बांधवांचा असला तरीही हा सण साजरा करणाऱ्या इतर धर्मियांचे प्रमाण लक्षणीय आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेम, करुणा आणि वात्सल्याचा संदेश घेऊन हा सण येतो. प्रभू येशूच्या दिव्यत्वाची प्रचिती जगभरातील कोट्यावधी लोकांना आली आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्यांनी दिलेल्या प्रेम, शांती, समता आणि बंधुता या तत्वावर मानवतेची वाटचाल होत आहे.




नाताळ म्हणजे सुट्ट्या आणि उत्साहाचे वातावरण. नाताळच्या तयारीची लगबगही सुरू असणार. खरेदी, घर सजवणे, मिठाई आणि किंवा तयार करणे, ख्रिसमस ट्रीची सजावट करणे आणि पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करणे यामध्ये बहुतांश वेळ जात असेल.
वेगवेगळ्या शहरात राहणारे कुटुंबाचे सदस्य एकाच ठिकाणी येऊन हा सण साजरा करतात. आपल्या आप्तेष्ठांना शुभेच्छा देण्याची, मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची ही खास वेळ असते. परंतु, काही कारणास्तव सर्वजण एकत्र येऊ शकत नाही किंवा आपले अनेक मित्र-मैत्रीण, नातेवाईक असतात त्यांना या दिवशी भेटणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना व्हाट्सअॅप, फेसबुक किंवा मेसेजद्वारे शुभेच्छा देणे हा पर्याय उपलब्ध राहतो. आम्ही काही संदेशांचे संकलन केले आहे. आपल्या आप्तेष्टांंना देऊन या सणाचा आनंद द्विगुणित करा.
१. नाताळचा सण,
सुखाची उधळण,
मेरी ख्रिसमस,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
२. ही ख्रिस्त जयंती आणि येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो या शुभेच्छा
३. आला पाहा नाताळ घेऊनी आनंद चहुकडे,
केलेल्या चुकांची माफी मागा प्रभूकडे,
मनात धरुया आशा सर्व सुखी राहू दे,
सुरात गाऊया धर्मगाणे मदतीचे
४. येशू ख्रिस्तांचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात प्रेम, आनंद, उत्साह, हास्य आणि समाधानाचा वर्षाव घेऊन येवो. मेरी ख्रिसमस
५. सारे रोजचेच तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, नाताळच्या शुभेच्छा
६. प्रभूचा आशिष अवतरला,
नव साज घेऊनी,
आता द्या आणि घ्या
प्रेमच प्रेम भरभरुनी
७. वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला
८. सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे याच नाताळच्या शुभेच्छा
९. आपल्या जीवनातील सुख समृद्धी वाढू दे, जीवनातील अशुभाचा अंधकार मिटू दे हीच प्रभू येशू चरणी प्रार्थना करुन मी आपणास नाताळच्या शुभेच्छा देतो.
१०. या नाताळच्या शुभक्षणांनी, आपली सारी स्वप्ने साकार व्हावी, या नाताळची पहाट ही अनमोल आठवण ठरावी, प्रभू येशूच्या कारुण्याच्या नजरेनी आपली दुःखे विरावी याच नाताळच्या शुभेच्छा.
११. आला नाताळ सण,घेऊनी आनंद मनात,
सर्व चुकांची माफी मागितली मनात,
सर्वाना सुखी करावे हीच आशा उरात,
मदत हाच धर्म, गाणे गावे सुरात.
या नाताळात, सांताक्लॉज आपणासाठी अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो!
नाताळच्या शुभेच्छा! मेरी ख्रिसमस.!