ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने गर्दीवर आळा घालण्यासाठी काही निर्बंध लादले आहे. अशात मोठ्या कंपन्या, शाळा आणि महाविद्यालयांनी पुन्हा एकदा कर्मचारी, विद्यार्थ्यांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शाळेसाठी इंटरनेटची गरज आहे. यासाठी चांगला स्पीड आणि उत्तम नेटवर्क असलेल्या कंपन्या कामी येतात. मात्र यासोबत कंपन्यांचे प्लान खिशाला परवडतील का? याकडेही लक्ष असतं. जिओ, बीएसएनएल आणि एअरटेलकडे अनेक कमी किमतीचे प्लान आहेत, जे जास्त स्पीड देतात आणि ओटीटी फायदे देखील त्यासोबत उपलब्ध आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच पाच प्‍लान्सबद्दल सांगणार आहोत, ज्‍याचा वापर घरातून काम करण्‍यासाठी आणि ऑनलाइन शाळेसाठी होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्स जिओचा ३९९ रुपयांचा प्लान ३० एमबीपीएस स्पीड आणि अमर्यादित डेटा आणि कॉलिंग ऑफर करतो. या प्लॅनमध्ये कोणतेही ओटीटी फायदे नाहीत. पण जिओ कमी किमतीत अमर्यादित डेटा देत आहे. जिओचा ६९९ रुपयांचा प्लान अमर्यादित डेटा आणि कॉलिंगसह १०० एमबीपीएस स्पीड ऑफर करतो. या प्लानमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन नाही. पण अधिक स्पीड हवा असेल, त्यांच्यासाठी ही योजना सर्वोत्तम आहे. जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला १५० एमबीपीएस स्पीडसह अमर्यादित डेटा मिळतो. त्यासोबत तुम्हाला मोफत कॉलिंग देखील मिळते. प्लॅनमध्ये १६ अ‍ॅप्सची मोफत सदस्यता उपलब्ध आहे. ज्यामध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम, डिस्ने प्लस हॉटस्टार, सोनी लिव, झी5 आणि ऑल्ट बालाजी यांचा समावेश आहे.

तुमचा CIBIL Score फ्रीमध्ये ऑनलाइन चेक करा; जाणून घ्या प्रक्रिया

बीएसएनएलच्या ३९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये २०० जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये यूजरला १० एमबीपीएसचा स्पीड मिळतो. डेटा संपल्यानंतर, डेटाचा वेग २ एमबीपीएस पर्यंत कमी होतो. यासोबत मोफत लँडलाइन कनेक्शन उपलब्ध आहे, ज्याद्वारे अमर्यादित कॉलिंग करता येते.

व्यावसायिक व्हिडीओ रेझ्युमे कसा बनवायचा? जाणून घ्या

एअरटेलचा हा एंट्री लेव्हल प्लान आहे,४९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३० दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये ४० एमबीपीएसच्या स्पीडसह ३.३ टीबीपर्यंत अमर्यादित इंटरनेट उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि शॉ अकादमीचे सदस्यत्व तसेच एअरटेल थँक्स फायद्यांचाही समावेश आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best five broadband plan for work from home and online school rmt
First published on: 21-01-2022 at 11:31 IST