Which Flour is best: तुम्ही रोजच्या आहारात ज्या पिठाच्या पोळ्या खाता, त्या तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. योग्य पिठाची निवड केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते आणि आरोग्यही चांगले राहते.

डॉक्टर सलीम जैदी सांगत आहेत की, गहू, ज्वारी आणि नाचणी यांसह वेगवेगळ्या पिठांपैकी आरोग्याच्या दृष्टीने कोणते पीठ अधिक चांगले आहे आणि पोळ्या बनवण्यासाठी पीठ निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

नाचणीचे पीठ: नाचणीचे पीठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. तसेच याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध होतो. यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. डॉक्टर सलीम जैदी यांनी या पिठाला पहिला क्रमांक दिला आहे.

हरभऱ्याचे पीठ: हरभऱ्याच्या पिठामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या लोकांसाठीही हे पीठ फायदेशीर आहे, कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. डॉक्टरांनी या पिठाला दुसरा क्रमांक दिला आहे.

बाजरी किंवा ज्वारीचे पीठ: बाजरी आणि ज्वारीचे पीठ फायबरने समृद्ध असते. तसेच या दोन्ही धान्यांमध्ये ग्लुटेन नसते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हिवाळ्यात तुम्ही बाजरीच्या पिठाच्या तर उन्हाळ्यात ज्वारीच्या पिठाच्या पोळ्या खाऊ शकता.

गव्हाचे पीठ: गव्हाच्या पिठामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. तसेच त्यात ग्लुटेन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे डॉक्टर सलीम जैदी इतर पौष्टिक आणि ग्लुटेनमुक्त धान्यांच्या तुलनेत गव्हाच्या पिठाला कमी प्राधान्य देतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)