झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टींचे सेवन

रात्री शांत झोप येण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

best food to eat at night to get good sleep
रात्री शांत झोप येण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन

दिवसभर जर आपल्याला अॅक्टिव्ह राहायचं असेल तर त्यासाठी रात्रीची झोप पूर्ण होणे महत्वाचं आहे. परंतु जेव्हा आपल्याला रात्री झोप लागतं नाही, तेव्हा आपण दुसऱ्या दिवशी अॅक्टिव्ह राहत नाही. झोप पूर्ण न होणे ही एक सामान्य समस्या असून अनेकांना रात्री झोप लागत नाही. तणावपूर्ण जीवनशैलीचा आपल्या झोपेवर परिणाम होतो असे म्हटले जाते.

खरतंर स्लीपिंग सायकल हे एक सारखे असने खूप कठीण आहे. बहुतेक लोक यासाठी गोळ्या घेतात. परंतु त्याचबरोबर अनेक दुष्परिणाम देखील आहेत. जर तुम्हाला नीट झोप येत नसेल तर खाली दिलेल्या काही पदार्थांचे सेवन करा. यामुळे तुम्हाला शांत झोप येईल.

आणखी वाचा : तांदूळ शिजवण्याआधी उकळत्या पाण्यात ‘या’ दोन गोष्टी टाका अन् भात चिकटण्याची समस्या टाळा

१. रताळं
तुम्हाला झोप येत नसेल तर रताळं खा. केळी प्रमाणेच रताळ्यात पोटॅशियम, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. या सगळ्या जीवनसत्वांमुळे आपलं शरीर हे रिलॅक्स होतं. रात्री झोपायच्या आधी रताळं आवडेल त्यापद्धतीने बनवून खा. यामुळे तुम्हाला झोप लवकर येईल आणि शांत झोप मिळेल.

२. बदाम
बदाममध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण हे जास्त असते. यामुळे आपले स्नायु रिलेक्स होते आणि आपल्याला झोप येते.

आणखी वाचा : दह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ ५ गोष्टींचे सेवन

३. खसखसचे दूध
ज्या लोकांना रात्री झोप येत नाही त्यांनी खसखसचे दूध प्यायला पाहिजे. झोपण्याआधी कोमट दूध पिण्यास आपले आजी-आजोबा आधी पासून सांगतात. कारण झोपण्या आधी कोमट दूध प्यायल्याने आपलं शरीर रिलॅक्स होतं. तर झोपायच्या २० ते ४० मिनिटे आधी खसखसचे दूध पिल्याने तुम्हाला लवकर आणि शांत झोप येईल.

४. केळी
केळीचे सेवन केल्याने देखील झोप येते. जर तुम्हाला तणाव आहे तर केळी खा. कारण केळी खाल्याने झोप येते.

आणखी वाचा : बटाटे आणि कांदे एकत्र ठेवत असाल तर हे नक्की वाचा

आपल्याला पुरेशी झोप मिळणे आपल्या शरिरासाठी गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्हाला झोप येत नसेल तर आम्ही दिलेल्या पदार्थांचे सेवन नक्की करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Best food to eat at night to get good sleep dcp