Best Foods For Kidney : किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीरात रक्त शुद्ध करण्याचे काम करतो, याशिवाय शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकणं, पाणी व खनिज संतुलन राखण्याचे कार्य करतो. पण हल्ली खाण्याच्या चुकीच्या सवयी, कमी पाणी पिणे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे किडनीसंबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. पण, योग्य आहाराचे सेवन केल्यास तुम्हाला आयुष्यात कधी किडनीचा त्रास होणार नाही, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही पदार्थ किडनीच्या आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर असतात. नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट आकाश हेल्थकेअरचे संचालक डॉ. विक्रम कालरा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत किडनीचे आरोग्य राखण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याविषयी सांगितले आहे.

किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी काय खावे? (Super Foods For Your Kidneys Health)

किडनीचे आरोग्य राखण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार आवश्यक आहे. सूज कमी करणारे आणि किडनीवर अतिरिक्त ताण येणार नाही अशा पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश असावा.

१) सफरचंद

सफरचंद हे किडनीसाठी फायदेशीर मानले जाते. त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. ते कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासदेखील मदत करू शकतात.

२) लसूण

लसूण किडनीसाठीदेखील चांगला मानला जातो. त्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात. ते मिठला पर्याय म्हणून देखील वापरले जाऊ शकते, जे आहारातील सोडियम कमी करण्यास मदत करते.

३) हिरव्या पालेभाज्या

मेथी, लाल माट आणि पालक यांसारख्या हिरव्या पालेभाज्यादेखील किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यामध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी शरीराला पोषण देतात आणि किडनीचे कार्य उत्तम राखण्यास मदत करतात.

४) बेरी

याव्यतिरिक्त बेरी, द्राक्षे आणि डाळिंब यांसारखी फळेदेखील किडनीसाठी फायदेशीर मानली जातात. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास आणि पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात.

५) पाणी

किडनीच्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणेदेखील महत्त्वाचे आहे. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो.

काय खाऊ नये? (Best Foods for Kidney Health)

किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फक्त योग्य अन्न खाणे पुरेसे नाही; काही पदार्थ टाळणेदेखील आवश्यक आहे. जास्त मीठ, जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ किडनीवर अतिरिक्त ताण आणू शकतात, म्हणून त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. निरोगी आहारासह नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि नियमित आरोग्य तपासणीदेखील किडनी निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.