मधुमेह हा असा आजार आहे ज्याचा एक तरी रुग्ण प्रत्येक घरात आढळला जातो. मधुमेहच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. साखरेच्या रुग्णांनी प्रामुख्याने आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल आणि जे आरोग्यासाठी फायदेशीर असतील. मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत भरपूर फायबर आणि कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करावा असं डॉक्टर देखील सुचवतात. आपल्या संपूर्ण दिवसाच्या आहारात रोटी हे सर्वात महत्वाचे अन्न आहे. पोळी बनवताना वापरल्या जाणाऱ्या पिठामध्ये असलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे मधुमेह रुग्णाच्या साखरेवर खूप परिणाम होतो. काही प्रकारचे पीठ रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी या चार प्रकारच्या पिठाच्या सेवनाने साखरेवर नियंत्रण तर राहतेच शिवाय शरीराला चांगली ऊर्जाही मिळते. चला जाणून घेऊया कोणते चार प्रकारचे पीठ आहे, ज्याचे सेवन केल्याने मधुमेही रुग्णांचे शरीर निरोगी राहते आणि साखर नियंत्रणात राहते.

( हे ही वाचा: Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांनी शरीरामध्ये होणाऱ्या ‘या’ बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये)

चणा डाळीच्या पिठाने साखर नियंत्रणात राहील

चण्याच्या पिठात खनिजे, जीवनसत्त्वे, फायबर , प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो, जो साखर नियंत्रित करण्यात प्रभावी ठरतो. या पिठापासून बनवलेली पोळी खाल्ल्याने हृदय, किडनी आणि फुफ्फुसांचे आरोग्यही चांगले राहते. या पीठामुळे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदय निरोगी राहते.

बाजरीचे पीठ मधुमेह नियंत्रणात ठेवते

ज्या लोकांची साखर जास्त आहे त्यांनी बाजरीचे पीठ खावे. बाजरीच्या पीठात भरपूर फायबर असते आणि ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरते. बाजरीचे पीठ फायबरने समृद्ध असते. हे पीठ हळूहळू पचते आणि ग्लुकोज तयार करण्यास वेळ लागतो. याच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो.

( हे ही वाचा: वयाच्या ४५-५० व्या वर्षी रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे? जाणून घ्या चार्ट आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी टिप्स)

सोया पोळी देखील साखर नियंत्रित करते

सोयाबीन पोळी खाल्ल्यानेही साखरेचे नियंत्रण राहते. संशोधनानुसार, सोयामध्ये आयसोफ्लेव्होन आढळतात, जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. हे शरीरातील ग्लुकोज सहिष्णुता देखील वाढवू शकते. ही रोटी खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. ही रोटी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते आणि हृदय निरोगी ठेवते.

कट्टूच्या पिठाचे सेवन करा

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कट्टूचे पीठ खूप फायदेशीर आहे. या ग्लूटेन फ्री पीठात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते. त्याचप्र8 हे साखर नियंत्रणात देखील फायदेशीर आहे. या पिठात कमी कार्बोहायड्रेट, भरपूर फायबर आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतात.

( हे ही वाचा: Uric Acid: ‘या’ ४ आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही युरिक अॅसिड आणि सांधेदुखीपासून मुक्त होऊ शकता; जाणून घ्या तज्ज्ञांकडून)

किती पिठाची मात्रा पुरेशी आहे

मधुमेह तज्ञांच्या मते वयस्कर लोक जेवणात २ लहान पोळ्या खाऊ शकतात. मधुमेहामध्ये कार्बोहायड्रेट सर्वात जास्त मोजले जातात. मधुमेही रुग्णांच्या जेवणात ४५ ते ६० ग्रॅम कर्बोदकांचे सेवन पुरेसे असते. एका मध्यम पोळीमध्ये २० ते ३० ग्रॅम कर्बोदके असतात. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्ण २ छोट्या पोळ्या खाऊ शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best four flour to control blood sugar know how much quantity is necessary gps
First published on: 06-10-2022 at 14:35 IST