हिवाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते. केसांतील कोंड्यामुळे टाळूला खाज येते. त्यामुळे केसही कोरडे आणि निर्जीव होतात. जर तुम्हीही केसांमधील कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर काही सोपे घरगुती उपाय एकदा नक्की वापरून पाहा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल.

लिंबू
लिंबू हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी लिंबू सर्वात प्रभावी ठरेल. तेलात लिंबू मिसळून केसांच्या मुळांना लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Radish recipe
बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी

आणखी वाचा : Health Tips : पोटातून येणारा गुडगुड आवाज गंभीर आजारांचं लक्षण ठरू शकतं! ‘हे’ पदार्थ खाणं ताबडतोब सुरू करा

मेथी
मेथीच्या दाण्यांची पावडर बनवा आणि या पावडरमध्ये दही मिसळा. रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी केसांना लावा आणि तासभर असेच ठेवा. काही वेळाने केस सौम्य शाम्पूने धुवा. यामुळे कोंडा दूर होण्यास मदत होईल.

आणखी वाचा : Hair Care Tips : हिवाळ्यात केस गळणे लगेच कमी होईल, हे सोपे घरगुती उपाय नक्की वापरून पाहा

ताक
ताक वापरल्याने कोंड्याच्या समस्येतही आराम मिळेल. ताकाने केस धुतल्याने कोंड्याची समस्या दूर होईल.

(टिप: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. आम्ही याची पुष्टी करत नाही.)