भारतीय टेलिकॉम कंपन्या सध्या आपल्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी उत्तम असे रिचार्ज प्लॅन्स देत आहेत.कोरोना महामारीमुळे, टेलिकॉम कंपन्या वापरकर्त्यांसाठी अधिक डेटा देण्याकरिता प्लॅन्स ऑफर करत आहेत. तसेच एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया सारख्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांसाठी दररोज 3 जीबी डेटाचे रिचार्ज प्लॅन देत आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये डेटासह मोफत व्हॉईस कॉलिंगची सुविधाही देखील वापरकर्त्यांना देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या तीन कंपन्यांचे प्लॅनबद्दल.

व्होडाफोन-आयडियाचा ३९८ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

आयडिया (Idea) च्या 398 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला रोजच्या वापरासाठी ३ GB(जीबी) डेटा दिला जातो. यासह, वापरकर्त्याला या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत व्हॉइस कॉलिंग सुविधा देखील देण्यात आली आहे. हा रिचार्ज प्लॅन वापरकर्त्याला दररोज १०० SMS वापरण्यास देते. तसेच व्होडाफोन-आयडियाच्या या रिचार्ज प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. याशिवाय, वापरकर्त्यांना वीकेंड डेटा रोलओव्हर, व्ही मूव्हीज (vi movie) आणि टीव्ही (tv),व्हीआयपी(VIP) आणि बिंज ऑल नाईट या प्लॅनमध्ये फ्री एक्सेस दिला जात आहे.

एअरटेल(airtel) चा ३९८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

व्होडाफोन-आयडियाच्या प्लॅन प्रमाणे, एअरटेलचा प्लॅन देखील ३९८ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा वापरकर्त्याला दिला जाणार आहे. ज्याची वैधता २८ दिवस असून या प्लॅनमध्ये ८४ जीबी डेटा एका महिन्यात वापरकर्त्याला दिला जातोय.एअरटेलच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगच्या सुविधेसह वापरकर्त्याला दररोज १०० (SMS) एसएमएस सुविधा देखील दिली जातेय. या व्यतिरिक्त, वापरकर्त्याला एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम, विनामूल्य हेलोटोन्स, Amazon प्राइम व्हिडिओ आणि विंक म्युझिकमध्ये फ्री अॅक्सेस दिला जात आहे.

जिओचा ३४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओचा हा प्लॅन व्होडाफोन-आयडिया (VI) आणि एअरटेलच्या (Airtel) प्लॅनपेक्षा ४९ रुपये स्वस्त आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला दररोज 3 जीबी डेटा मिळतो, ज्याची वैधता २८ दिवस आहे. यासह, या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील दिली जातेय. या प्लॅनमध्ये युजर्सना Jio Cinema, Jio News, Jio TV, Jio Cloud आणि Jio Security चे मोफत सबस्क्रिप्शन मिळू शकते.