उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. या ऋतूत उन्हामुळे आणि मातीमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. त्वचेवर मुरुम, पिंपल्स वगैरे होऊ लागतात. इतकंच नाही तर यामुळे त्वचाही निस्तेज दिसते, उन्हाळ्याच्या ऋतूत चेहऱ्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि सुंदर होण्यासाठी त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हे आम्ही तुम्हाला इथे सांगतो.

त्वचेचं सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करा

Five common eye infections you should be aware of this monsoon season
पावसाळ्यात डोळ्यांना होऊ शकतो ‘या’ ५ प्रकारचा संसर्ग? कशी घ्यावी काळजी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या
How to care for your lips in monsoon Do This Home Remedy To Keep Lips Soft In The Rain
Lip Care in Monsoon: पावसाळ्यात ओठांची काळजी कशी घ्याल? मऊ ओठांसाठी ‘या’ सोप्या टीप्स फॉलो करा
How to protect your skin from common infections during monsoon Tips
पावसाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या त्रास देऊ शकतात; ‘या’ उपायांनी मिळवा लगेच आराम
Ladyfinger Face Pack benefits of ladyfinger face pack for glowing and soft skin
Skin care: त्वचेवर रोज लावा भेंडीचं पाणी, फरक पाहून विश्वास बसणार नाही; जाणून घ्या कसं बनवायचं
these five things should keep in your car in monsoon
पावसाळ्यात कार घेऊन बाहेर पडताय? मग गाडीमध्ये ‘या’ पाच गोष्टी असायलाच हव्यात! पाहा यादी
jaggery use for hair problem should you apply jaggery directly to your hair
केसांना गूळ लावल्याने केस वाढण्यासह होतात नैसर्गिकरीत्या मजबूत? याबाबत डॉक्टर काय म्हणतात घ्या जाणून….
benefits of watermelon juice
दररोज टरबुजाचा रस प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला

सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे वय अकाली होऊ शकते. सूर्याची हानिकारक किरणे टाळण्यासाठी उन्हाळ्यात सनस्क्रीन लावायलाच हवी. असे केल्याने त्वचेवर होणारं टॅनिंग टळेल आणि तसेच काळे डाग पडणार नाहीत.

त्वचा हायड्रेटेड ठेवा

उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो, ज्यामुळे त्वचा डिहायड्रेट होते. त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही हायड्रेटिंग फेस मास्कचा वापर करू शकता. त्याचबरोबर त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

टोनर

प्रथम तुळशीची पाने नीट धुवून घ्या. नंतर ही पाने पाण्यात उकळा. जेव्हा हे पाणी अर्ध्यावर कमी होईल तेव्हा ते गॅसवरून काढून घ्या. पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या. आता या पाण्यात थोडे गुलाब पाणी आणि ग्लिसरीन घाला. हे टोनर एका बाटलीत साठवा. तुळशीपासून बनवलेले हे टोनर तुम्ही नियमित वापरल्याने चेहऱ्यावरील मुरुमांची आणि डागांची समस्या दूर होईल.

एलोवेरा

एलोवेरा आपल्या त्वचेसाठी फार महत्वाचा आहे. एलोवेरामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. स्किनच्या समस्या टाळण्यासाठी क्रिम किंवा पावडरचा वापर करा. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसत नाहीत. अंघोळीनंतर हे जेल चेहऱ्याला लावल्यास चमकदार त्वचा दिसते.

सनस्क्रीन

सनस्क्रीन लावल्याने सुर्याच्या हानीकारक किरणांपासून बचाव होतो. चेहऱ्याला सनस्क्रीन लाववल्याने उन्हापासून बचाव होतो याशिवाय त्वचा ग्लोईंग आणि मॉईश्चराईज दिसते.

हेही वाचा >> Kitchen Jugaad Video: सिलेंडर रिकामा होताच सर्वात आधी त्याखाली पिशवी ठेवा; मोठं नुकसान टळेल

उन्हाळ्यातही मॉइश्चरायझर आवश्यक

उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट करण्यात आणि मॉइश्चराइझ करण्यात अजिबात निष्काळजी होऊ नका. त्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि प्लम्पी दिसते. नेहमी आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून ते त्वचेवर जमा झालेले पाणी शोषून फक्त हायड्रेटच नाही तर त्वचेला मॉइश्चरायझ देखील करते.