Best Sleeping Positions for Better Rest : त्वचेच्या विविध समस्यावर बाजारात अनेक महागड्या अँटी-एजिंग क्रिम्स आणि स्किनकेअर प्रोड्क्टस उपलब्ध आहेत. पण तुमच्या झोपण्याच्या चुकीच्या स्थितीमुळेही त्वचेचे नुकसान होते. हे जाणून तुम्हाला आश्चर्च वाटेल, पण शांत झोपेसाठी तुम्हाला योग्य स्थितीत झोपणं गरजेचे आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील आणि इतर अनेक त्वचेच्या समस्याही कमी होतील.

जर्नल ऑफ एस्थेटिक सर्जरीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, झोपण्याच्या स्थितीचा परिणाम केवळ तुमच्या मान आणि कमरेवरच होत नाही, तर त्यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. झोपण्याच्या कोणत्या स्थितींमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची शक्यता जास्त असते जाणून घेऊ…

झोपण्याची स्थिती आणि चेहऱ्याची रचना

जेव्हा आपण कुशीवर किंवा पोटावर झोपतो, तेव्हा आपल्या चेहऱ्याची नाजूक त्वचा आणि उशी यांचा सतत संपर्क असतो. या काळात चेहऱ्यावर तीन प्रकारचे बल कार्य करतात: कॉम्प्रेशन, म्हणजे चेहरा दाबणे, टेन्शन, म्हणजे त्वचा ताणणे, आणि शियर फोर्सेस म्हणजे त्वचा घासणे.

Award Banner

जेव्हा तुम्ही तासनतास एकाच कुशीवर झोपता, तेव्हा या दाबामुळे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचा खराब होते. तरुण वयात त्वचा काही दिवसांनी नॉर्मल होते, परंतु वयाच्या तिशीनंतर कोलेजनचे उत्पादन कमी झाल्यामुळे झोपेमुळे पडलेल्या या स्लीप लाइन्स सुरकुत्यांमध्ये बदलतात.

१) पोटावर झोपणे – ही स्थिती तुमच्या त्वचेसाठी सर्वात हानिकारक मानली जाते. तुमचा चेहरा पूर्णपणे उशीत दाबला जातो, ज्यामुळे त्वचेला श्वास घेता येत नाही आणि संपूर्ण चेहऱ्यावर समान दाब पडतो. यामुळे केवळ सुरकुत्याच वाढत नाहीत, तर डोळ्यांखाली सूजही येते.

२) एका कुशीवर झोपणे – बहुतेक लोक या स्थितीत झोपतात. यामुळे गालांवर आणि हनुवटीवर जास्त दाब पडतो. त्यामुळे जे लोक नेहमी एकाच कुशीवर झोपतात, त्यांच्या चेहऱ्याच्या दुसऱ्या बाजूपेक्षा त्याच बाजूला जास्त खोल सुरकुत्या पडण्याची शक्यता असते.

३) पाठीवर झोपणे – सुरकुत्या आणि बारीक रेषा टाळण्यासाठी पाठीवर झोपणे उत्तम आहे . तुमचा चेहरा उशीच्या संपर्कात येत नाही, त्यामुळे त्वचेवरील दाब कमी होतो.

लोक अनेकदा झोपेमुळे पडणाऱ्या सुरकुत्यांना वृद्धत्वामुळे किंवा हसण्यामुळे पडणाऱ्या सामान्य सुरकुत्या समजतात, पण त्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे.

एक्सप्रेशन लाइन्स – हसताना किंवा रागावताना स्नायूंच्या आकुंचनामुळे तयार होतात.

स्लीप रिंकल्स – त्वचेवर बाह्य दाब पडल्याने आणि ती ताणली गेल्याने तयार होतात.