Morning VS Night Body Scrub : केवळ चेहऱ्याचीच नाही तर संपूर्ण शरीराची त्वचा गुळगुळीत करण्यासाठी स्क्रब हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र, स्किन टाईपसह त्याची वेळदेखील तितकीच महत्त्वाची आहे. यामुळे बॉडी स्क्रब नियमित वापरण्याचे फायदे, त्वचेच्या प्रकारानुसार त्याची निवड कशी करावी आणि वेळ कशी ठरवावी जाणून घेऊ…

बॉडी स्क्रबचे फायदे:

  • मृत त्वचा निघून जाते आणि नवीन पेशी (सेल्स) तयार होतात.
  • त्वचा अधिक मऊ आणि एकसारखी दिसते.
  • त्वचेच्या छिद्रांमधील (पोर्स) तेल, घाम आणि बॅक्टेरिया साफ होतात.
  • स्किन केअर उत्पादने अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात.

कोणती त्वचा आणि कोणती वेळ?

ऑयली आणि कॉम्बिनेशन त्वचा : या त्वचेसाठी सकाळची वेळ योग्य आहे. यामुळे तेल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.

ड्राय (कोरडी) त्वचा : या त्वचेसाठी रात्रीची वेळ योग्य आहे. रात्रीच्या वेळी त्वचा रिपेअर होते आणि भरपूर हायड्रेशन मिळते.

सेन्सेटिव्ह त्वचा : या प्रकारच्या त्वचेसाठी रात्रीची वेळ सर्वात उत्तम आहे. सकाळी स्क्रब केल्यास त्वचा अधिक संवेदनशील होऊ शकते.

नॉर्मल त्वचा : या त्वचेवर सकाळ आणि रात्र दोन्ही वेळा सूट होतात, तुम्ही तुमच्या दिनचर्येनुसार (रुटीन) निवड करू शकता.

सकाळी स्क्रबिंग करण्याचे फायदे:

दिवसभरासाठी तुमची त्वचा पूर्णपणे तयार होते.

रात्रीच्या वेळी जमा झालेले मृत सेल्स निघून जातात.

दिवसा लावले जाणारे लोशन आणि सनस्क्रीन त्वचेमध्ये चांगले शोषले जातात.

रात्री स्क्रबिंग करण्याचे फायदे:

त्वचा रिपेअर होण्याचे काम वेगाने होते.

दिवसभरातील स्किनकेअर उत्पादने व्यवस्थित निघून जातात.

रात्रीच्या स्किन केअरचा अधिक फायदा होतो.

यूव्ही किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासूनही बचाव होतो.

बॉडी स्क्रब कधी वापरावा?

हेअर रिमूवल : शेव्हिंग किंवा वॅक्सिंग करण्याच्या २४ ते ४८ तास आधी बॉडी स्क्रब वापरावा.

टॅन रिमूवल : रात्रीच्या वेळी स्क्रब केल्यास जास्त फायदा होतो.

केसांची वाढ (हेअर ग्रोथ) कमी करण्यासाठी : अशा वेळी आठवड्यातून १ ते २ वेळा स्क्रबिंग केल्याने फॉलिकल्स स्वच्छ राहतात

केवळ चेहऱ्याचीच नव्हे, तर संपूर्ण शरीराची त्वचा मुलायम करण्यासाठी स्क्रब हा एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार स्क्रब वापरण्याची वेळही तितकीच महत्त्वाची आहे.

वर्कआउट केल्यानंतर नियमितपणे स्क्रब वापरल्याने त्वचेचे पोर्स बंद होत नाही आणि शरीरावर मुरुमे (एक्ने) होण्याचा धोका कमी होतो. मात्र, बारीक दाणे असलेला (small granules) बॉडी स्क्रब जास्त चांगला पर्याय आहे.

या वेळी बॉडी स्क्रब वापरू नका:

उन्हामुळे त्वचा जळाल्यास किंवा सनबर्न झाल्यास.

शेव्हिंग किंवा वॅक्सिंग केल्यानंतर लगेच.

दररोज बॉडी स्क्रब वापरणे टाळा.

त्वचेवर कोणतीही समस्या किंवा जखम असल्यास.