२०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन

जिओने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बाजारात उतरताच फ्री कॉलिंग आणि स्वस्त डेटा देण्यास सुरूवात केली होती.

भारतीय मोबाईल वापरकर्त्यांसाठी बाजारात सध्या अनेक अनलिमिटेड प्लॅन उपलब्ध आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्या एकापेक्षाएक स्वस्त प्लॅन देत आहेत. यामध्ये अनलिमेटेड कॉलिंगसोबत डेटाही दिला जातोय. जिओमुळे भारतीय टेलिकॉम क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. जिओने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बाजारात उतरताच फ्री कॉलिंग आणि स्वस्त डेटा देण्यास सुरूवात केली होती. आकर्षित होऊन ग्रहक जिओकडे वळाले. जिओकडून मिळाणाऱ्या या तगड्या स्पर्धेत राहण्यासाठी इतर कंपनीने मिळते जुळते प्लॅन आमंलात आणले. सध्या प्रीपेड वापरणाऱ्यांना अनेक प्लॅनचे पर्याय उपलब्ध आहेत. पण, आज आम्ही तुम्हाला २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीच्या आणि विवध कंपनीच्या प्लॅनची माहिती सांगणार आहोत…

व्होडाफोन १९९ रूपयांचा प्लॅन –
व्होडाफोनचा १९९ रूपयांचा प्लॅन ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना दररोज १.५ जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस फ्री दिले जात आहेत. या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. हा प्लॅन घेणाऱ्या वापरकर्त्याला व्होडाफोन प्लेअॅपचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते.

आयडिया १९९ –
या प्लॅनमध्ये आयडिया तुम्हाला अनलिमिडेट कॉलिंगसह दररोज १.५ जिबी डेटा आणि १०० एसएमएस दिले जात. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे.

एअरटेल १९९-
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १.५ जिबी आणि १०० एसएमएस मिळणार आहेत. याची वैधता २८ दिवसांची आहे. त्यासोबत हा प्लॅन अॅक्टिवेट करणाऱ्या वापरकर्त्यांना एअरटेल टिव्ही प्रिमियर आणि जी५चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.

जिओ १९८ –

२८ दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा आणि १०० एसएमएससोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच जिओ अॅपचा मोफत वापरही मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Best unlimited prepaid plan from reliance jio vodafone idea airtel