पावसाळ्यात आणि एरवीही अनेक आजार हे दूषित पाण्यातून पसरतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कावीळ, कॉलरा, डायरिया असे आजार उद्भवू शकतात. हल्ली नोकरी, घर अशी धावपळ असल्याने बाजारात मिळणाऱ्या ब्रॅंडेड वॉटर प्युरीफायरचा पाणी शुद्ध करण्यासाठी वापर केला जातो. मात्र पूर्वी वापरले जाणारे पाणी स्वच्छ करण्याचे उपाय आजही तितकेच फायदेशीर ठरतात. तसेच यामुळे वीजेचीही बचत होते. तसेच ज्या ठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध नसते त्यांच्यासाठी तर हे उपाय जास्तच फायदेशीर ठरतात. तेव्हा घरच्या घरी पाणी स्वच्छ करण्याच्या काही खास पद्धती…

१. पाणी गाळून घेणे – वॉटर प्युरीफायरमध्ये पाणी गाळले जाते. त्याचप्रमाणे स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीची गाळणी यांनी पाणी गाळून घेतल्यास ते स्वच्छ होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या पद्धतीचा हमखास वापर करावा. मी चागंल्या सोसायटीमध्ये राहतो त्यामुळे आमच्याकडे चांगले पाणी येते असे वाटत असले तरीही पाणी कायम गाळून मगच प्यावे.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स

२. उकळणे – पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून गार करुन प्यावे असे डॉक्टरही अनेकदा सांगतात. उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेले पाणी प्यावे.

३. तुरटी फिरवणे – तुरटी फिरवून पाणी शुद्ध करणे ही अतिशय पारंपरिक पद्धत आहे. भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होते. मात्र तुरटी फिरवली असली तरीही हा पाणी स्वच्छ करण्याचा म्हणावा तितका खात्रीशीर उपाय नसल्याने हे पाणी गाळून आणि उकळूनच प्यावे.

४. नळाला फडके किंवा फिल्टर बसविणे – पावसाळ्याच्या दिवसात नळाला काहीसे मातकट आणि अशुद्ध पाणी येते. त्यामुळे हे पाणी भरतानाच काही प्रमाणात स्वच्छ व्हावे यासाठी नळाला कापड बांधावे किंवा गाळणे लावावे. याशिवाय हल्ली बाजारात नळाला लावण्यात येणारी वेगवेगळी फिल्टर्स उपलब्ध असतात. त्यांचा वापरही फायदेशीर ठरु शकतो. यामुळे पाण्यातील सौम्य प्रकारच्या जंतूंचा धोका कमी होण्यास मदत होते.