Symptoms of Nail Diseases :तुम्ही कधी विचार केला आहे का की जी नख तुमच्या हाताचे किंवा पायाचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात तेच शरीरात काय समस्या आहेत हे देखील सांगू शकतात. तुम्हालाही विश्वास बसत नाहीये ना. नुकतेच एका भूलतज्ञ आणि वेदना औषध चिकित्सक डॉ. कुनाल सुद यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये त्यांनी, नखे तुमच्या आरोग्याबाबत काय सांगते हे स्पष्ट केले.

तुमच्या नखांमध्ये बदल होत असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, काहीतरी गडबड आहे असा तुमचा पहिला विचार असू शकतो. तथापि, बऱ्याच प्रकरणांमध्ये, पिवळेपणा, रेषा उमटणे किंवा ठिसूळपणा यांसारखे बदल हे केवळ वाढत्या वयाचा किंवा दैनंदिन झीजेचा भाग असतात. मात्र, काही विशिष्ट बदल हे एखाद्या शरीरातीलआरोग्य समस्येकडे निर्देश करू शकतात.

नखांमुळे कसा समसजतो आजार?Nail Signs Of Disease

नखांवर पांढरे डाग ( white spots on the nails)

जर तुमच्या नखांवर पांढरे डाग असतील तर ते नख चावल्याने, एखाद्या जखमेमुळे किंवा वारंवार मॅनीक्युअर करण्यामुळे होते पण तुम्ही जर हे डाग दिर्घकाळापासून असतील तर तुमच्या शरीरात कॅल्शिअरमची किंवा झिंकची कमतरता असल्याची शक्यता असू शकते. त्यामुळे तुम्हाला शंका वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा.

नखांचा आकार चमच्यासारखा होणे ( nails are shaped like a spoon)

जर तुमची नखे चमच्यासारखी वाकलेली असतील आणि त्यांचा खालचा भाग आत दाबलेला असेल व ती बराच काळ तशीच राहत असतील, तर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असू शकते, परंतु हे शोधण्यासाठी रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.

पिवळे किंवा जाड नखे (yellow or thick nails)

जर तुमचे नख पिवळे किंवा जाड असतील तर त्यामध्ये बुरशी संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे पण सोरायसिस, एक्झिमा किंवा जखमेमुळे देखील असे होण्याची शक्यता आहे त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

नाखांवर काळी रेघ दिसत ( black lines on your nails?)

जर तुमच्या नखांवर काळी रेख दिसत असेल आणि दीर्घकाळापासून ती तशीच असेल तर त्याकडे दुर्लक्ष करते धोकादायक ठरू शकते. कारण डॉक्टरांच्या मते कधी कधी हे नेल मेलानोमा जे त्वचेच्या कॅन्सरचा एक प्रकार आहे याचा संकेत असू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर त्याच्या रंगात बदल झाल्याचे जाणवले तर त्वरित डॉक्टरांना भेटा.

कोरडी, भेगा पडलेली किंवा ठिसूळ नखे (Dry, Cracked, or Brittle Nails)

सुमारे २०% लोकांना ठिसूळ नखांचा त्रास होतो. न्यूयॉर्कस्थित त्वचारोगतज्ञ आणि ‘स्किन रूल्स’च्या लेखिका डॉ. डेब्रा जॅलिमन यांच्या मते, याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • क्लोरीनचे पाणी: क्लोरीनयुक्त जलतरण तलावांमध्ये (Swimming Pools) जास्त वेळ पोहणे.
  • रसायन आणि रिमूव्हर: नेल पॉलिश रिमूव्हरचा अतिवापर करणे.
  • पाणी व डिटर्जंटचा संपर्क: हातमोजे (Gloves) न घालता वारंवार भांडी घासणे किंवा कपडे धुणे.
  • कोरडे हवामान: कमी आर्द्रता (Low Humidity) असलेल्या वातावरणात राहणे.

जर तुमची नखे सतत ठिसूळ होत असतील आणि त्याचे कारण स्पष्ट नसेल, तर त्वचारोगतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सोरायसिस (Psoriasis), एक्झिमा (Eczema) आणि हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism) यांसारख्या वैद्यकीय समस्यांमुळेही नखे कोरडी व ठिसूळ होऊ शकतात.

भांडी घासताना किंवा रसायनांचा वापर करताना सुती अस्तर असलेले रबरी हातमोजे वापरा. नेल पॉलिश रिमूव्हर वापरताना ॲसिटोन-मुक्त (Acetone-free) रिमूव्हर निवडा. हात धुतल्यानंतर लगेचच नखांवर आणि हातांवर चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर किंवा व्हेसलीन लावा.

आडव्या रेषा (बो-ज लाईन्स – Beau’s Lines):

नखांवर खोल, आडवे खड्डे किंवा रेषा येणे म्हणजे बो-ज लाईन्स. नखांची नैसर्गिक वाढ काही काळासाठी थांबल्यामुळे हा प्रकार घडतो. जेव्हा शरीराला मोठा आजार होतो (उदा. ताप, फ्ल्यू, निमोनिया किंवा गोवर), तेव्हा नखांची वाढ तात्पुरती थांबते. नंतर नखे पुन्हा वाढू लागतात, त्यामुळे या रेषा भूतकाळातील आजाराचे संकेत देतात (सध्या आजारी असल्याचे नाही). याशिवाय ‘रेनॉड्स आजार’ (Raynaud’s disease) मध्ये बोटांमधील रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे किंवा कर्करोगावरील किमोथेरपी उपचारांमुळेही (जवळपास ५०% रुग्णांमध्ये) नखांवर अशा आडव्या रेषा दिसून येतात.

नखांवर लहान खड्डे पडणे (Pitting):

नखांच्या पृष्ठभागावर लहान आणि कमी खोल खड्डे दिसणे याला पिटींग म्हणतात. हे प्रामुख्याने त्वचेच्या दाहक आजारांमुळे (Inflammatory Skin Conditions) होते. सोरायटिक आर्थरायटिस (Psoriatic arthritis – जवळपास ८०% रुग्णांमध्ये नखांमध्ये बदल दिसतात), सोरायसिस (Psoriasis), एक्झिमा (Eczema) आणि ॲलोपेशिया एरिएटा (Alopecia areata) या समस्यांमुळे नखांवर खड्डे पडू शकतात.

क्लबिंग (Clubbing) – नखांचा आकार फुग्यासारखा किंवा वक्राकार होणे :

हा प्रकार इतर समस्यांपेक्षा दुर्मिळ आहे. यामध्ये बोटांची टोके सुजतात आणि नखे खालच्या बाजूने वक्राकार (गोल) होऊन फुग्यासारखी दिसतात. क्लबिंग हे सहसा शरीरातील गंभीर आजारांचे लक्षण असते. यातील ८०% प्रकरणे ही फुफ्फुस आणि छातीच्या आजारांशी संबंधित असतात; जसे की फुफ्फुसाचा कर्करोग (Lung cancer), ब्रोन्किएक्टॅसिस आणि सिस्टिक फायब्रोसिस. तसेच ५% प्रकरणे ही पोटाच्या/आतड्यांच्या दाहक आजारांशी (IBD) जोडलेली असतात. हे लक्षण अनुवांशिक असू शकते, तरीही असे बदल दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे