ब्लॅक फ्रायडे, सायबर सोमवार २०२१: जाणून घ्या वार्षिक शॉपिंग इव्हेंट्सबद्दलचा इतिहास

१९५०-६०च्या दशकात यूएसमध्ये ब्लॅक फ्रायडेला त्याचे नाव मिळाले.

lifestyle
हा दिवस ख्रिसमसच्या खरेदी करण्याची सुरुवात दर्शवितो(photo: indian express/ Pixabay)

ब्लॅक फ्रायडे हा वार्षिक शॉपिंग इव्हेंट आहे जो थँक्सगिव्हिंगनंतर शुक्रवारी सुरू होतो आणि बहुतेक वेळा सायबर मंडे म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोमवारपर्यंत असतो. हा दिवस ख्रिसमसच्या खरेदी करण्याची सुरुवात दर्शवितो, जो वर्षाच्या अखेरीस चालतो. ब्लॅक फ्रायडे २०२१ च्या आधी साजरा का केला जातो, तर तुम्हाला या इव्हेंटबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

ब्लॅक फ्रायडे २०२१ आणि सायबर मंडे २०२१ कधी आहे?

या वर्षी ब्लॅक फ्रायडे २६ नोव्हेंबर आहे, थँक्सगिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ नोव्हेंबरला आहे, म्हणूनच या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी सायबर मंडे असेल.

ब्लॅक फ्रायडे का म्हणतात?

१९५०-६०च्या दशकात यूएसमध्ये ब्लॅक फ्रायडेला त्याचे नाव मिळाले जेव्हा फिलाडेल्फिया पोलीस विभागाने थँक्सगिव्हिंग आणि आर्मी-नेव्ही गेम्समधील दिवसाचा संदर्भ देण्यासाठी “ब्लॅक फ्रायडे” हा शब्द वापरला. तेव्हा शुक्रवार दिवस होता जेव्हा मोठ्या संख्येने लोकं शहरात खरेदी करत होते आणि गर्दी आणि समोरून येणाऱ्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी पोलिसांना तासनतास कसरत करावी लागली.

१९८०च्या दशकात हा दिवस व्यापार्‍यांसाठी वर्षातील सर्वात यशस्वी दिवसांपैकी एक बनला, ज्यांनी चांगला नफा दर्शविण्यासाठी या दिवसाचा उल्लेख ब्लॅक फ्रायडे म्हणून केला कारण ते फक्त काळ्या शाईमध्ये वापरले जात होते. त्यात नुकसान दर्शविण्यासाठी लाल शाईचा वापर करत असते तेव्हा या दिवशी मात्र कमी लाल रंगाचा वापर केला गेला.

आज हा शब्द अधिक किरकोळ संदर्भ घेतला जातो आणि ख्रिसमसच्या खरेदी करण्याचे संकेत चिन्हांकित करतो, जो थँक्सगिव्हिंगच्या आदल्या दिवशी सुरू होतो. ब्लॅक फ्रायडे शॉपिंग म्हणजे शुक्रवारी स्टोअर्स उघडल्यावर सर्वोत्तम डील मिळविण्यासाठी स्टोअरच्या बाहेर कॅम्पिंगचा संदर्भ दिला जात असे, तर आताच्या काळात तुम्हाला हे शॉपिंग मॉल्स आणि स्टोअरमध्ये ऑफलाइन आणि Amazon सारख्या ई-कॉमर्स पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सर्वोत्तम डील होते.

सायबर सोमवार म्हणजे काय?

२००० च्या दशकाच्या सुरुवातीस, किरकोळ विक्रेत्यांनी ब्लॅक फ्रायडे वीकेंडला खरेदी करू न शकणाऱ्या खरेदीदारांमध्ये नवीन खरेदीची पद्धत पाहिली. हे खरेदीदार सहसा घर किंवा कामावरून, पुढील सोमवारी योग्य मोलभाव शोधण्यासाठी ऑनलाइन खरेदी करतात.

तो दिवस पटकन सायबर मंडे म्हणून ओळखला जाऊ लागला आणि २०१४ पर्यंत सायबर सोमवार हा वर्षातील सर्वात व्यस्त दिवस होता, मात्र यावेळी ऑनलाइन डेस्कटॉप विक्री $2 अब्ज पेक्षा जास्त होती आणि त्यात यूएस हा इतिहासातील सर्वात व्यस्त दिवस होता.

भारतात ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे

भारतीय शॉपिंग कॅलेंडरमध्ये ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे फार मोठी गोष्ट नाही कारण भारतीय त्यांच्या प्रमुख सणांमध्ये, सहसा दसरा आणि दिवाळी दरम्यान मोठी खरेदी करतात. तथापि, Amazon आणि Flipkart सारख्या प्रमुख ईकॉमर्स खेळाडूंनी त्याच दिवशी भारतात ब्लॅक फ्रायडे शॉपिंग सीझनची स्वतःची पुनरावृत्ती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे या अटी दरवर्षी अधिक लोकप्रिय होत आहेत.

त्यांच्या या बाजूने गती वाढत असल्याने ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे २०२१ हा आधीपेक्षा मोठ्या पद्धतीने वाढण्याची अपेक्षा आहे कारण गेली २ वर्ष करोनामुळे संपूर्ण देश बंद होता. त्यामुळे आता देश हळूहळू महामारीच्या प्रभावातून बाहेर पडत आहे. यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, परिधान आणि पादत्राणे अशी अनेक वस्तु काही प्रमुख श्रेणी असल्याने २६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान विक्री वाढण्याची अपेक्षा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Black friday cyber monday 2021 all you need to know about the annual shopping events scsm

ताज्या बातम्या