Black Grapes Vs Raisins Benefits: आयुर्वेदात आहारालाच पहिले औषधी ज्ञान मानले जाते. सुश्रुतांपासून ते आधुनिक आयुर्वेदिक विद्वानांपर्यंत फळे, भाज्या आणि सुकामेव्याच्या औषधी गुणधर्मांचा उल्लेख करताना द्राक्षे आणि मनुका यांना विशेष स्थान दिले गेले आहे. अनेकदा लोक त्याला एक सामान्य फळ किंवा चविष्ट सुकामेवा समजतात. मात्र आयुर्वेदानुसार, ही द्राक्ष वर्गातील एक वनस्पती आहे, जिच्यामध्ये शरीरातील वात, पित्त आणि कफ या तीन दोषांना संतुलित करण्याची क्षमता आहे. पित्त कमी करण्यासाठी, पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आणि रक्त शुद्धीकरणासाठी मनुका आणि द्राक्षांचे नियमित सेवन अत्यंत प्रभावी मानले जाते.
आयुर्वेदिक डॉक्टर रूपाली जैन यांच्या मते, द्राक्षे आणि मनुका यांचा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. काळी द्राक्षे सुकवून मनुके बनवले जातात. आयुर्वेदात द्राक्षांचा समावेश सर्वोत्तम फळांमध्ये केला आहे. तर मग आयुर्वेदानुसार तज्ज्ञांकडून जाणून घेऊ मनुका आणि द्राक्षे यांचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत…
द्राक्ष आणि मनुके यांतील फरक
द्राक्षे हे जास्त पाणी असलेले ताजे फळ आहे. आयुर्वेदात त्यांना शीतला देणारे आणि ताजेपणा देणारे मानले जाते. याउलट मनुका म्हणजे सुकवलेली काळी द्राक्षे, त्यामुळे त्या पोषक तत्वांनी आणि साखरेने समृद्ध असतात.
द्राक्षांचे आयुर्वेदिक फायदे
आयुर्वेदात द्राक्षांना गोड, थंड आणि पौष्टिक फळ मानले जाते. पित्त आणि शरीरातील उष्णतेशी संबंधित समस्यांवर ते फायदेशीर मानले जाते. द्राक्षांचे सेवन केल्याने थकवा, अशक्तपणा, जास्त तहान, तोंड कोरडे पडणे आणि शरीरात जळजळ होणे यासारख्या त्रासांपासून आराम मिळतो. आयुर्वेदात द्राक्षे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्यांवर देखील उपयुक्त मानली जातात. शिवाय शरीराचे पोषण करण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी ती अत्यंत प्रभावी मानली जातात.
मनुक्याचे आयुर्वेदिक फायदे
आयुर्वेदात मनुके पौष्टिक आणि शक्तीवर्धक मानले जातात. अशक्तपणा, थकवा आणि पोषक तत्वांची कमतरता असलेल्यांना मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो. भिजवलेले मनुके बद्धकोष्ठतेवर फायदेशीर मानले जातात. आयुर्वेदानुसार, मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. शरीरातील उष्णता, तहान आणि अशकतपणा कमी करण्यासाठीही मनुके उपयुक्त ठरतात असे म्हटले जाते.
थकवा आणि अशक्तपणावर गुणकारी
मनुके आणि द्राक्षे खाल्ल्याने शरीराला पोषण मिळते. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे असतात. अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी हे घटक फायदेशीर असतात.
अॅनिमियावर प्रभावी
मनुके हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात आणि आयुर्वेदात रक्ताभिसरण सुधारण्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. जर तुमच्या हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल किंवा तुमच्यामध्ये लोह, व्हिटॅमिन बी१२ किंवा फोलेटची कमतरता असेल, तर मनुके खाणे फायदेशीर आहे.
द्राक्षे पोषणासाठी उपयुक्त
द्राक्षे आणि मनुके शरीरातील विविध धातूंना पोषण देतात असे सांगितले जाते. यामध्ये गर आणि शुक्र या धातूंचा उल्लेख केला जातो. मनुके हे सुकवलेल्या द्राक्षांचेच एक रूप असून त्यात नैसर्गिक शर्करा, कार्बोहायड्रेट्स आणि काही सूक्ष्म पोषक घटक असतात, ते भरपूर पोषण देतात आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
वात-पित्त यावर गुणकारी
द्राक्षे आणि मनुके वात आणि पित्त दोषांवर गुणकारी मानले जातात. त्यांचा मऊ आणि तुलनेने जड गुणधर्म हा वात दोषाच्या कोरडेपणाच्या विरूद्ध मानला जातो. शरारीताली अतिरिक्त उष्णता, लघवी करताना होणारी जळजळ, तहान, आम्लपित्त आणि छातीत जळजळ यासारख्या समस्यांमध्ये हे दोन्ही खाणं अत्यंत प्रभावी ठरतं.
पोट साफ होत नसेल आणि बद्धकोष्ठतेसाठी द्राक्षे खा
द्राक्षे आणि मनुके शौचास साफ होण्यास मदत करतात असे सिद्ध झाले आहे. त्यातील फायबर आणि नैसर्गिक साखर काही लोकांमध्ये शौचास मऊ करण्यास आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यास मदत करू शकतात. बद्धकोष्ठता बऱ्याच दिवसांपासून असेल, वारंवार होत असेल किंवा शऔचातून रक्त पडणे, तीव्र पोटदुखी किंवा वजन कमी होणे यासारखी लक्षणे दिसत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लघवीच्या समस्यांसाठी मनुके
वारंवार लघवी येणे, लघवी करताना जळजळ होणे, कमी प्रमाणात लघवी होणे आणि प्रोस्टेटशी संबंधित समस्या असल्यास मनुके खावेत.
मनुक्याचे सेवन कसे करावे?
आयुर्वेदात ताजी, पिकलेली द्राक्षे खाण्याचा सल्ला दिला जातो. ताजी द्राक्षे उपलब्ध नसल्यास सुकी द्राक्षे किंवा मनुके वापरता येतात. द्राक्षे पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून सकाळी ते पाणी मनुक्यांसोबत प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
जुलाब होत असल्यास द्राक्षे आणि मनुके खाणे टाळा
आयुर्वेदानुसार, जर एखाद्या व्यक्तीला जुलाब होत असतील, तर त्यांनी मनुके किंवा द्राक्षे खाऊ नयेत. मनुक्यांमुळे शौचास लवकर होऊ शकते. जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ शकतात, म्हणून भरपूर द्रवपदार्थ पिणे आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मनुक्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरीज असतात, त्यामुळे त्यांच्या सेवनाबाबत जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारानुसार मनुक्यांचे सेवन करावे. कुठल्याही परिस्थितीत दार्क्षे किंवा मनुके औषधांना पर्याय समजू नये.
