काजू, बदाम, बेदाणे तसेच अक्रोड खाणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोड मानवी मेंदूच्या आकारात दिसतो, ज्यामुळे त्याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यात सर्वाधिक ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. याशिवाय अक्रोडमध्ये ऊर्जा, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, प्रोटीन, मेलाटोनिन, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात. तसेच अक्रोड कुकीज, केक, पुडिंग, मिठाई, एनर्जी बार, गोड मिठाई, इत्यादींमध्ये वापरले जाऊ शकते. तुम्ही तपकिरी अक्रोड खूप खाल्ले आहे, पण तुम्हाला माहित आहे का की काळे अक्रोड देखील आहेत. होय, काळे अक्रोड, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटिऑक्सिडेंट संयुगे, आरोग्यास अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो.

काळ्या अक्रोड मध्ये असलेले पोषक घटक

वरिष्ठ आहारतज्ञ व FSTL, तसेच इंडियन स्पाइनल इंज्युरीजच्या हिमांशी शर्मा यांच्या नुसार काळ्या अक्रोडात अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल गुणधर्म असतात. यासोबतच प्रथिने, फायबर, मिनरल्स, जीवनसत्त्वे यांचाही हा मुख्य स्रोत आहे.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

काळे अक्रोड खाण्याचे फायदे व नुकसान

आहारतज्ञ हिमांशी शर्मा यांच्या मते काळे अक्रोड मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने लो डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी काळे अक्रोड खावे.

काळ्या अक्रोडचे नियमित व प्रमाणात सेवन केल्यास जळजळ होण्याची समस्या कमी होऊ शकते.

भूक लागल्यास काळे अक्रोड खा, कारण त्यात फायबरचे प्रमाणात जास्त असते. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.

काळ्या अक्रोडमध्ये असलेले अँटी-फंगल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

काळे अक्रोड कर्करोग, हृदयरोग, पीसीओडी, यकृत रोग इत्यादींपासून देखील संरक्षण करू शकते.

दरम्यान काळ्या अक्रोडाच्या फायद्यांबरोबरच काही नुकसान देखील आहेत, जसे की जास्त प्रमाणात सेवन केल्याने एलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते. प्रत्येकाला सारखीच ऍलर्जी होईल असे नाही.

काळ्या अक्रोडमध्ये असलेले टॅनिन पोटाच्या विकारांसाठी अँटीकोआगुलंट्स किंवा विशिष्ट औषधांमध्ये व्यत्यय आणू शकतात.

जर तुम्हाला काळ्या अक्रोडाचे सेवन करायचे असेल तर पोषणतज्ञ, तज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोडाचे सेवन केल्यास चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या आरोग्यासाठी योग्य आहेत. स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता सुधारते. मुलांची स्मरणशक्ती वाढते. फॉलेट, व्हिटॅमिन बी 9 च्या उपस्थितीमुळे, गर्भवती महिलांच्या शरीरात फॉलिक ऍसिडची कमतरता नसते. यामध्ये असलेले उच्च फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात. अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, ओमेगा-३ त्वचा आणि केस निरोगी ठेवतात. फायबर असल्यामुळे अक्रोड बद्धकोष्ठता दूर करते, पचनसंस्था निरोगी ठेवते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी अक्रोड हा एक चांगला पर्याय आहे, यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.