Bladder Cancer Symptoms: मूत्राशयाच्या कोणत्याही भागात होणाऱ्या कॅन्सरला ब्लॅडर कॅन्सर किंवा मूत्राशयाचा कॅन्सर म्हणतात. मूत्राशयाच्या कोणत्या भागात कॅन्सर झाला आहे, यावर त्याचा प्रकार अवलंबून असतो.
मूत्राशय हा शरीरातील असा अवयव आहे, जिथे लघवी जमा होते आणि साठवून ठेवली जाते. त्यामुळे मूत्राशयाच्या कॅन्सरची बहुतांश लक्षणे लघवीशी संबंधित असतात. यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसकडून जाणून घ्या, मूत्राशयाच्या कॅन्सरची लक्षणे कशी दिसतात.
लघवी करताना जळजळ होणे
मूत्राशयाचा कॅन्सर झाल्यास लघवी करताना जळजळ जाणवते. जळजळ होण्यासोबतच वेदना होतात आणि लघवी करताना खाजही जाणवते.
वारंवार संसर्ग होणे
वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग होणे हे ब्लॅडर कॅन्सरचे लक्षण असू शकते. मूत्राशयाचा कॅन्सर झाल्यास लघवीशी संबंधित संसर्ग वारंवार होऊ शकतात.
वारंवार लघवीला जाणे
मूत्राशयाचा कॅन्सर झाल्यास दिवसभरात अनेक वेळा लघवीला जावे लागते. याशिवाय, अचानक लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होते आणि लघवी रोखून ठेवणे कठीण होते.
भूक न लागणे
मूत्राशयाचा कॅन्सर झाल्यास व्यक्तीची भूक कमी होते. भूक लागत नाही आणि कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होऊ लागते.
कंबर आणि पोटात दुखणे
ब्लॅडर कॅन्सर झाल्यास रुग्णाला पोटाच्या खालच्या भागात आणि कंबरेत वेदना जाणवू शकतात. मूत्राशयाच्या आजूबाजूच्या भागातही दुखू शकते.
हाडांमध्ये वेदना होणे
हाडांमध्ये वेदना जाणवतात आणि हाडे कमकुवत होऊ लागतात. सतत थकवा जाणवतो आणि नेहमी आजारी असल्यासारखे वाटते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
